नवी दिल्ली : नवं वर्ष (New Year) उजाडण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षात 1 जानेवारीपासून बँकिंग (Banking) ते गॕस सिलिंडर (Gas Cylinder) शुल्क नियमनात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. नव्या शुल्क बदलाच्या यादीत बँकिंग, डेबिट तसेच क्रेडिट कार्ड आणि एलपीजी सिलेंडर शुल्काचा समावेश होतो. नव्या बदलामुळे तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात 1 जानेवारी 2022 पासून बदलाधीन नियम जाणून घेऊया-
1 जानेवारीपासून एटीएम मधून पैसे काढण्यावर अधिक शुल्क आकारले जाणार आहे. RBI द्वारे प्रति महिना एटीएम ट्रान्झॕक्शनची संख्या निश्चित करण्यात आली आहे. निर्धारित मर्यादेनंतरच्या ट्रान्झॕक्शनवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. अशाप्रकारच्या प्रति ट्रान्झॕक्शनवर 21 रुपये अदा करावे लागतील.तसेच अतिरिक्त जीएसटी देखील अदा करावा लागेल. यापूर्वी अतिरिक्त ट्रान्झॕक्शनवर 20 रुपयांचे शुल्क द्यावे लागत होते.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने नवीन नियमाची माहिती जारी केली आहे. 1 जानेवारीपासून रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्यावरील शुल्कात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने निर्धारित केलेल्या मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
>> एटीएमच्या निर्धारित मर्यादेनंतरच्या ट्रान्झॕक्शनवर 21 रुपयांचे
>> पोस्ट पेमेंट बँकेच्या पैसे जमा/काढणी शुल्कात वाढ
>> डेबिट/क्रेडिट कार्डसाठी एन्क्रिप्टेड टोकनचा वापर
>> गूगलच्या विविध सेवांच्या वापरावर शुल्क
>> नव्या वर्षात LPG सिलेंडर किंमतीत बदल
तुम्ही आॕनलाईन व्यवहारांसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करत असल्यास नवीन बदलाची माहिती घ्या. रिझर्व्ह बँक आॕफ इंडिया 1 जानेवारी पासून नियमात बदल करणार आहे. RBI द्वारे आॕनलाईन पेमेंट सुरक्षित करण्यासाठी वेबसाईट आणि पेमेंट गेटवे द्वारे स्टोअर केलेला ग्राहकांचा डाटा हटविण्याचे निर्देश दिले आहेत. एन्क्रिप्टेड टोकनचा वापर करण्यास सांगितले आहे.
गूगलच्या विविध सेवांच्या वापरावर शुल्क आकारणी केली जाणार आहे. गूगल अॕड,यू-ट्यूब, गूगल प्ले स्टोअर आणि अन्य सेवांच्या वापरावर शुल्क अदा करावे लागेल. तसेच गूगल तुमच्या कार्डवर केलेले पेमेंट तपशील सेव्ह करणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष पेमेंट करावे लागेल.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांद्वारे गॕस सिलिंडरचा भाव निश्चित करतात. त्यामुळे येत्या 1 तारखेपासून प्रस्तावित असणारी LPG सिलेंडरच्या किंमती लक्षात येतील.
इतर बातम्या :