नवी दिल्ली – आपण ज्या पध्दतीने बँकेच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवतो, तसाच किंवा त्यापेक्षाही अधिक चांगला पर्याय आता आपल्याला इंडियन पोस्ट बँकेने उपब्ध करून दिला आहे. गुंतवणूकीसाठी बँकेपेक्षा अधिक विश्वासू पर्याय म्हणून पोस्टाकडे पाहिले जाते. जे लोक दर दिवशी अथवा दर महिन्यालाृ ठरावीक पैशांची बचत करून, शेवटी एक चांगला परतावा मिळू इच्छितात त्यांच्यासाठी पोस्टच्या योजना सर्वोत्तम ठरतात. विशेष: बँकांपेक्षा पोस्टाच्या शाखा अधिक असल्याने ग्रामीण भागातील लोकांना पोस्ट बँकेमध्ये सहज गुंतवणूक करता येऊ शकते, तसेच गरजेच्या वेळी आपले पैसे काढता देखील येऊ शकतात. आज जवळपास देशातील प्रत्येक गावामध्ये पोस्टाचे कार्यालय आहे.
इंडियन पोस्ट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना सुरू केली आहे. या योजनेच्या नावाप्रमाणेच ग्राहकांना या योजनेतून दर महिन्याला पैसे कमवण्याची संधी मिळते. थोडक्यात ही योजना मुदत ठेव योजनेसाराखी आहे. आपन पोस्ट बँकेमध्ये एक ठराविक रक्कम ठराविक मुदतीपर्यंत ठेवायची. त्या रकमेवर मिळणारे व्याज प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यामध्ये जमा होते. पोस्टाकडून ठेवीवर मिळणारे व्याजदर हे इतर बँकेंच्या तुलनेत अधिक असते.
दरम्यान जे ग्राहक थोडी -थोडी बचत करून शेवटी परतावा म्हणून एक मोठी रकम मिळू इच्छितात त्यांच्यासाठी देखील पोस्टाने एक चांगली योजना आणली आहे. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना असे तिचे नाव आहे. या योजनेमध्ये ग्राहक हा पोस्ट ऑफीसमध्ये आपले खाते उघडून, त्यामध्ये दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम जमा करतो. जेव्हा या योजनेचा कालावधी पूर्ण होतो, तेव्हा संबंधित ग्राहकाला परतावा म्हणून एक मोठी रक्कम मिळते.
संबंधित बातम्या