नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (PNB-Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना बँकिंग फसवणुकीबद्दल अलर्ट जारी केलेत, त्यांना फिशिंग घोटाळ्यांपासून सावध राहण्यास सांगितलेय. काही फसव्या बँका ग्राहकांना भाग्यवान विजेते होण्याचा मेसेज देत आहेत आणि त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या खात्यातून पैसे काढत आहेत. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर काळजी घ्या.
देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या बँकिंग फसवणुकीबद्दल इशारा देत आहेत. एसबीआयनंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना बँकिंग फसवणुकीबाबत अलर्ट जारी केलाय.
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या अलर्टचा उल्लेख केलाय. यासोबतच सावधान राहण्याचे आवाहन करणारे ट्विट जारी करण्यात आलेत. तुम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही तर तुम्ही विजेते कसे होऊ शकता, असा प्रश्नही बँकेने आपल्या ग्राहकांना विचारलाय.
Isn’t something fishy?
The answer is if you haven’t participated in a lottery, you can’t win it.
Report such incidents of fraudulent messages on https://t.co/qb66kLcXD4.
Be mindful.#BeCyberSafe pic.twitter.com/p8qnR9piKD
— Punjab National Bank (@pnbindia) August 14, 2021
फसव्या बँका ग्राहकांना संदेश पाठवत आहेत, ज्यात लिहिले आहे, ‘अभिनंदन, तुम्ही आमच्या स्पर्धेचे भाग्यवान विजेते आहात, तुम्हाला एक लाख रुपयांची भेट देण्यात आली, या लिंकवर क्लिक करा.
1 OTP, PIN, CVV, UPI पिन शेअर करू नका.
2 बँक खात्यातून पैसे काढले तर काय करावे
3 फोनवर बँकिंग माहिती कधीही जतन करू नका
4 एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड माहिती शेअर करू नका
5 बँक कधीही कोणतीही माहिती विचारत नाही
6 ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घ्या
7 चाचणीशिवाय सॉफ्टवेअर स्थापित करू नका
8 अज्ञात लिंक तपासा
9 स्पायवेअरपासून सावध राहा
संबंधित बातम्या
916 सोने म्हणजे काय आणि 22 कॅरेट सोन्यापेक्षा किती वेगळे?, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या
पॅन-आधार लिंक करणे आवश्यक, परंतु ‘या’ लोकांना सूट, पाहा संपूर्ण यादी
Beware if you get a message to be a lucky winner of Rs 1 lakh, an alert has been issued by PNB