नवी दिल्ली : आघाडीची टेक कंपनी गुगलनं (Google) रिलायन्स जिओ (Reliance Jio) नंतर भारती एअरटेल (Bharti Airtel) मध्ये गुंतवणूक करणार आहे. गूगलने नुकतीच भारती एअरटेलमध्ये एक अरब डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यापैकी 70 कोटी डॉलर म्हणजेच 5,224 कोटी रुपयांच्या इक्विटी गुंतवणुकीचा देखील समावेश आहे. भारताच्या डिजिटायझेशनच्या (INDIA DIGITISATION) दिशेनं गूगलने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून गूगलनं गुंतवणुकीचं हे पाऊल उचललं आहे. गूगल-एअरटेल गुंतवणूक करारामुळे भारतीयाचं बजेट स्मार्टफोन तसेच अन्य अँड्रॉईड डिव्हाईस सार्वत्रिक उपलब्धीकरणाचं स्वप्न प्रत्यक्षाता साकार होणार आहे. त्यासोबतच 5G आणि अन्य आधुनिक पद्धतींचा विचार करुन विशेष नेटवर्क डोमेन तयार करण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर केला जाईल.
• गूगलची भारती एअरटेल मध्ये एक अरब डॉलरची गुंतवणूक
• यापैकी 70 करोड डॉलरच्या इक्विटी गुंतवणुकीचा समावेश
• गूगलला 734 रुपये भावाने शेअर जारी केले जातील
• एयरटेलला गूगलमध्ये 1.28 टक्के भागीदारी मिळेल
एअरटेलच्या म्हणण्यानुसार, गूगलसह भागीदारीमुळे प्रत्येक भारतीयाचं स्मार्टफोनचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल आणि कंपनी 5G नेटवर्क साठी देखील गूगलसोबत कार्यरत राहणार असल्याचं एअरटेलनं स्पष्ट केलं आहे.
आघाडीची टेक कंपनी गूगलचा भारतातील टेलिकॉम कंपनीसोबतची दुसरी गुंतवणूक आहे. सर्वात पहिल्यांदा मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओमध्ये 7.73 टक्के भागीदारी खरेदी केली होती. तसेच गूगल-जिओनं स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) बनविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आरंभले होते.
‘गुगल फॉर इंडिया डिजीटलायझेशन फंड’ या अंतर्गत डिजिटल भारतासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई (Sundar Pichai) यांनी 2020 मध्ये केली होती. आगामी 5-7 वर्षांमध्ये ही गुंतवणूक टप्प्या-टप्प्याने केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केले आहे.
1. प्रत्येक भारतीयाला प्रादेशिक भाषेत माहितीची उपलब्धता होईल. माहितीची उपलब्धता सुलभ आणि मोफत असण्याचा प्रयत्न असेल.
2. भारतीय बाजारपेठेला अनुकूल नवीन उत्पादने आणि सेवांची निर्मिती
3. भारतीय अर्थव्यवस्थेला डिजिटल टच देण्याचा प्रयत्न असेल. डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात गती मिळेल.
4. छोट्या व्यावसायिकांना डिजिटल बदलासाठी सक्षम करणे तसेच आरोग्य, शिक्षण तसेच कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे.
इतर बातम्या
सुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली
Air India : एअर इंडिया टेकओव्हरनंतर टाटा ग्रुपचे पहिले ट्विट, वाचा सविस्तर