मुंबई : मागच्याच आठवड्यात अब्जाधीश आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदीपासून विभक्त होत असल्याच जाहीर केलं. लग्नाच्या 32 वर्षानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. नवाज मोदीने घटस्फोट देण्यासाठी पोटगीपोटी संपत्तीतील 75 टक्के वाटा मागितला आहे. नवाज मोदी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात पतीसोबतच त्यांचं नात कसं होतं? या बद्दल खुलासा केलाय. नवाज मोदी यांनी पती गौतम सिंघानिया यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. सप्टेंबर महिन्यात गौतम सिंघानिया यांनी मला आणि माझ्या मुलीला बेदम मारहाण केली होती, असा आरोप नवाज मोदी यांनी केलाय. 10 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास मारहाणीचा हा प्रकार घडला, असं नवाज मोदी यांनी सांगितलं. “गौतमने मला आणि माझ्या मुलीला निहारिकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जवळपास 15 मिनिट आम्हा दोघींना बेदम मारहाण सुरु होती. गौतमची बर्थ डे पार्टी झाल्यानंतर पहाटे 5 च्या सुमारास त्याने आम्हाला दोघींना मारहाण केली. 9 सप्टेंबरला गौतमचा वाढदिवस होता. मारहाण केल्यानंतर अचानक तो घटनास्थळावरुन गायब झाला. तो त्याची बंदूक किंवा दुसर काही शस्त्र आणायला चाललाय असं मला वाटलं” नवाज मोदी यांनी मुलाखतीत हा खुलासा केलाय.
सुरक्षेसाठी मी माझ्या मुलीला दुसऱ्या खोलीत घेऊन गेले. नवाज मोदीच्या या आरोपावर गौतम सिंघानिया यांनी काहीही कमेंट केलेली नाहीय. “माझ्या दोन सुंदर मुलींच्या हिताचा विचार करुन तसच मला माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा राखायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. माझ्या खासगी आयुष्याचा आदर करा” असं गौतम सिंघानिया इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदीमध्ये सर्वकाही आलबेल आहे असाच सगळ्यांचा समज होता. पण दिवाळी पार्टीच्या निमित्ताने दोघांमधील तीव्र मतभेद समोर आले. ठाण्यातील रेमंड स्टेटमध्ये गौतम सिंघानिया यांनी दिवाळी पार्टीच आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये नवाज नोदीला एन्ट्री मिळाली नाही. त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली. 13 नोव्हेंबरला गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदीपासून वेगळं होत असल्याच जाहीर केलं.
गौतम सिंघानिया यांचं लग्न कधी झालं?
58 वर्षांचे असलेले गौतम सिंघानिया यांनी 1999 मध्ये सॉलिसिटर नादर मोदी यांची मुलगी नवाज मोदीबरोबर लग्न केलं. गौतम सिंघानिया यांची एकूण 11,660 कोटींची संपत्ती आहे. त्यात नवाज यांनी पोटगीपोटी 75% टक्के वाटा मागितला आहे. ही रक्कम 8745 कोटी रुपये होते.