नवी दिल्लीः भारतीय चलनातून 2000 रुपयांच्या नोटांची संख्या हळूहळू कमी होत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 223.30 कोटींवर आली, अशी माहिती सरकारने दिलीय. चलनात असलेल्या एकूण नोटांच्या हे प्रमाण सुमारे 1.75 टक्के आहे. मार्च 2018 मध्ये चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या 336.3 कोटी होती.
रिझर्व्ह बँकेने नुकताच एक अहवाल जारी केलाय. या अहवालानुसार RBI चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापणार नाही. या अहवालानुसार 2020-21 या आर्थिक वर्षात कागदी चलनाची संख्या 223301 लाख इतकी होती. मागील आर्थिक वर्षात (2019-20) ही संख्या 223875 लाख इतकी होती. चलनात 500 आणि 2000 च्या नोटांचे मूल्य एकूण मूल्याच्या 85.70 टक्के आहे. 500 च्या नोटांची संख्या 31.10 टक्के आहे. मार्च 2021 मध्ये लोकसभेत आणखी एक माहिती देण्यात आली होती, ज्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून 2000 रुपयांची नवी नोट छापण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले होते.
तत्कालीन अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले होते की, 30 मार्च 2018 पर्यंत एकूण चलनात 2000 च्या 3362 दशलक्ष नोटा होत्या. खंडाच्या बाबतीत तो 3.27 टक्के होता. व्यापाराच्या दृष्टीने हे मूल्य 37.26 टक्के होते. 26 फेब्रुवारी 2021 ला 2000 च्या नोटांची संख्या 2499 दशलक्षवर आली, जी एकूण नोटांच्या 2.01 टक्के आणि मूल्याच्या 17.78 टक्के आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2019 मध्ये एक निवेदन जारी केले होते, त्यानुसार 2000 च्या 3,542.991 दशलक्ष नोटा 2016-17 (एप्रिल 2016 ते मार्च 2017) या आर्थिक वर्षात छापण्यात आल्या होत्या. 2017-18 या आर्थिक वर्षात केवळ 111.507 दोन हजाराच्या नोटा छापण्यात आल्या. पुढील आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये केवळ 46.690 दशलक्ष 2000 च्या नोटा छापण्यात आल्या. एप्रिल 2019 पासून 2000 ची एकही नोट छापण्यात आलेली नाही. सरकारने आधीच सांगितले आहे की, मार्च 2022 पर्यंत एकही नोट छापली जाणार नाही.
Number of Rs 2,000 currency notes in circulation has decreased to 223.3 crore pieces or 1.75 per cent of total notes in circulation in November this year, compared to 336.3 crore pieces in March 2018: Govt
— Press Trust of India (@PTI_News) December 7, 2021
साहजिकच जेव्हा आरबीआय 2000 च्या नोटा छापत नाहीये, तेव्हा त्याऐवजी आणखी काही नोटा छापल्या जाणार आहेत. मिंटच्या अहवालानुसार, 2000 नोटांच्या जागी आता 200 आणि 500 रुपयांच्या नोटा येत आहेत. मार्च 2017 मध्ये 500 च्या नोटांच्या संख्येचा वाटा एकूण नोटांच्या संख्येत 5.9 टक्के होता, जो मार्च 2019 मध्ये वाढून 19.80 टक्के झाला. मूल्याबद्दल बोलायचे झाल्यास मार्च 2019 मध्ये सर्व 500 नोटांचे मूल्य चलनात असलेल्या चलनाच्या 51 टक्के होते, जे मार्च 2017 मध्ये केवळ 22.5 टक्के होते.
संबंधित बातम्या
चांगला क्रेडिट स्कोअरही आता कर्जाची हमी ठरणार नाही, रेटिंग सुधारण्यासाठी ही महत्त्वाची पावले
Gold And Silver Prices Today: सोने आज पुन्हा महागले, नेमका भाव किती?