Ruchi Soya FPO नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या रुची सोया या खाद्यतेल कंपनीचं नाव सध्या बाजारात चांगलंच चर्चेत आहे. या कंपनीवर मालकी हक्क Patanjali Ayurveda चा आहे. रुची सोया या कंपनीने कोरोना काळात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केलंय. कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 रुपयांपासून 1519 रुपयांपर्यंत पोहचली आहे. ही वाढ तब्बल 9600 टक्के इतके मोठी आहे. आता ही कंपनी 4300 कोटी रुपयांचा FPO (follow-on public offer) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. SEBI च्या नियमांमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागलाय. त्यामुळे लवकरच या कंपनीत शेअर खरेदी करण्याची मोठी संधी गुंतवणुकदारांना उपलब्ध होणार आहे (Big opportunity to invest in Ruchi Soya oil company of Ramdev baba Patanjali Ayurveda).
Ruchi Soya च्या प्रमोटर्सकडे या कंपनीचे तब्बल 98.90 टक्के शेअर्स आहेत. केवळ 1.1 टक्के शेअर्स सर्वसामान्य गुंतवणुकदारांकडे आहे. मात्र, सेबीच्या नियमानुसार, कोणत्याही सार्वजनिक कंपनीला आपल्या शेअर्सपैकी किमान 25 टक्के शेअर्स सामान्य गुंतवणुकदारांना द्यावे लागतात. कंपनीला स्वतःकडे जास्तीत जास्त 75 टक्के शेअर्स ठेवता येतात. याच नियमानुसार रुची सोया कंपनीला पुढील 3 वर्षांमध्ये आपले 25 टक्के शेअर्स विकावे लागणार आहेत. इथंच इतर गुंतवणूकदारांना या कंपनीत गुंतवणुकीची संधी तयार होतेय.
रुची सोया कंपनीने पहिल्या 1 महिन्यात 64 टक्के परतावा, 3 महिन्यात 73 टक्के, 1 वर्षात 40 टक्के आणि 3 वर्षात 9648 टक्क्यांचा शानदार परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिलाय. या आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सचा भाव 1242.95 रुपये आहे. 52 आठवड्यातील सर्वोत्तम भाव 1519.65 रुपये आहे. तर सर्वात कमी भाव म्हणून 403.75 रुपयांची नोंद आहे.
रुची सोयाचा एफपीओ पुढील 6 महिन्यात लाँच होईल. त्यावेळी कंपनी आपले कमीत कमी 9 टक्के भागीदारी विकेल. इश्यू कमिटीने निधी गोळा करण्यासाठी मंजुरी दिल्याचं कंपनीने सांगितलंय.
Big opportunity to invest in Ruchi Soya oil company of Ramdev baba Patanjali Ayurveda