नवी दिल्ली : प्रत्येक जण काही जन्माने श्रीमंत (Rich) नसतो. आपल्या कष्टाच्या जोरावर अनेक लोक अब्जाधीश (Billionaire) झाले. पण या अब्जाधीशांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात अगदी छोट्या नोकरीतून (Job) केली आहे. कोणी वृत्तपत्र वाटले तर कोणी स्वयंपाकी झाले. पण त्यांनी आयुष्यात ध्येय ठेवली आणि ती पूर्ण केली. त्यांच्याकडे एक युनिक आयडिया होती. त्याचा त्यांनी ध्यास तर घेतलाच पण तो पूर्ण ही केला. काही जणांना वारसा असला तरी मेहनत करावी लागते. तर काही जणांनी शुन्यातून साम्राज्य उभारलं आहे. आज जे अब्जाधीश आहेत, त्यांनी पण कधी काळी उमेदवारी केली आहे.
वॉरेन बफेंची पहिली नोकरी
वॉरेन बफे (Warren Buffett) यांना शेअर बाजारातील गुरु मानतात. जगातील श्रीमंतात त्यांचा सहावा क्रमांक आहे. ते बर्कशायर हॅथवे या समूहाचे सीईओ आणि चेअरमन आहेत. वॉरेन बफे यांनी कधीकाळी घरोघरी वृत्तपत्रा टाकण्याचे काम केले आहे. द वॉशिंग्टन पोस्ट हे दैनिक ते घरोघरी वाटत होते. यातून त्यांना 175 डॉलर प्रति महिना मिळत होता.
ॲमेझॉनचे संस्थापक कूक
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. उमेदवारीच्या काळात त्यांनी कूक म्हणून नोकरी केली आहे. मॅकडोनाल्डमध्ये त्यांनी फ्राई कूक म्हणून काम केले आहे. 1980 मध्ये त्यांनी ही नोकरी केली. त्यांना 2 डॉलर प्रति तास याप्रमाणे पगार मिळत होता. त्यानंतर त्यांनी कंम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी खासगी नोकरी केली. त्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी नशीब आजमावले.
नारायण मूर्ती यांची पहिली नोकरी
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ति (Narayana Murthy) यांनी रिसर्च असोसिएशट म्हणून पहिली नोकरी केली. त्यानंतर सिस्टम्स मॅनेजर म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी सॉफ्ट्रॉनिक्स नावाची कंपनी सुरु केली. पण ती चालली नाही. पुणे येथील पाटणी कम्प्युटरमध्ये त्यांना नोकरी करावी लागली. 1981 मध्ये त्यांनी मित्रांच्या मदतीने इन्फोसिस कंपनी सुरु केली.
धीरुभाईं अंबानी यांनी केली ही नोकरी
धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी गॅस स्टेशनवर पहिली नोकरी केली. त्यांना 300 रुपये महिना मिळत होता. या स्टेशनवर ते मॅनेजर झाले. यमन या देशात ते नोकरी करत होते. त्यानंतर ते भारतात परतले. त्यांनी रिलायन्सचं साम्राज्य उभारलं.
हॉस्टेल राहत होते रतन टाटा
रतन टाटा (Ratan Tata) अनेकांचे आदर्श आहेत. 1961 मध्ये जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये त्यांनी नोकरी केली. त्यापूर्वी ते टाटा मोटर्समध्ये काम करत होते. टेल्कोच्या जीटी हॉस्टेलमध्ये ते राहिले. त्यापूर्वी त्यांनी आयबीएममध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यांना नोकरी मिळाली, पण त्यांनी ती नोकरी केली नाही.