Billionaire Terry Gou : इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या मालकाला राजकारणाची गोडी! राष्ट्राध्यक्ष पदासाठी सोडली कंपनी

| Updated on: Sep 05, 2023 | 2:57 PM

Billionaire Terry Gou : जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक कंपनीला टाटा बाय बाय केला. या सर्वात तरुण उद्योजकाने वयाच्या 72 व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष पदाच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे. त्यांना राष्ट्राध्यक्ष पद भुषवायचे आहे. या वयात पण त्यांचा उत्साह वाखण्याजोगा आहे.

Billionaire Terry Gou : इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या मालकाला राजकारणाची गोडी! राष्ट्राध्यक्ष पदासाठी सोडली कंपनी
Follow us on

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि उत्पादनांचा पुरवठा करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) आहे. या कंपनीचे संस्थापक टेरी गाऊने (Terry Gou) कंपनीला टाटा बाय बाय केले आहे. गाऊ यांनी राष्ट्रपती निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. 72 वर्षीय गाऊ यांनी 1974 मध्ये Hon Hai Precision Industry च्या रुपाने फॉक्सकॉनची स्थापना केली. ही कंपनी करारावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, उत्पादनं तयार करुन देते. एपल (Apple) सहीत अनेक कंपन्या फॉक्सकॉनच्या ग्राहक आहेत. गाऊ यांची एकूण संपत्ती 6.8 अब्ज डॉलर आहे. वर्ष 2019 मध्ये त्यांनी कंपनीची जबाबदारी यंग लियू यांच्या खांद्यावर सोपवली. ते सध्या कंपनीचे चेअरमन आहेत. गोऊ हे कंपनीचे डायरेक्टर होते. पण निवडणुकीत उडी घेण्यासाठी त्यांनी हे पद पण सोडले.

अशी झाली सुरुवात

टेरी गाऊ यांचा जन्म 18 ऑक्टोबर, 1950 रोजी तैवानमधील तैपई येथे झाला. त्यांचे कुटुंबिय 1949 मध्ये चीनमधील गृहयुद्धाच्या होरपळीतून बाहेर पडण्यासाठी तैवान येथे पळून आले होते. गाऊ यांनी 24 व्या वर्षांपर्यंत एका रबर फॅक्टरीत आणि औषधी तयार करणाऱ्या कारखान्यात काम केले.

हे सुद्धा वाचा

अशी केली कंपनीची स्थापना

गाऊ यांनी एअरफोर्समध्ये एंटी-एअरक्राफ्ट आर्टिलरी ऑफिसर पदावर काम केले. 1974 मध्ये त्यांनी 7,500 डॉलर आणि दहा वयोवृद्धासह फॉक्सकॉन कंपनीची स्थापना केली. ही कंपनी टेलिव्हिजन सेट्सासाठी प्लास्टिक पार्टस तयार केले. 1980 मध्ये ते 11 महिन्यांसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आणि त्यांनी कंपनीचा विस्तार केला.

आयफोन तयार करते कंपनी

गाऊ यांनी त्यांची पहिली फॅक्टरी चीनमध्ये 1988 मध्ये सुरु केली होती. 1990 च्या दशकात त्यांनी एपल, एचपी आणि आयबीएम यासारख्या कंपन्यांसाठी उत्पादन सुरु केले. चीनच्या दक्षिण प्रातांत त्यांनी नवीन प्रकल्प सुरु केला आणि हजारो लोकांना रोजगार दिला. त्यांचे हे बिझनेस मॉडेल यशस्वी ठरले. इलेक्ट्रॉनिक उत्पादन जगभरात प्रसिद्ध झाले. एपलने मॅकबुक आणि आयफोनचे काम फॉक्सकॉनला दिले. त्यामुळे ही कंपनी काहीच दिवसांतच जगाच्या नकाशावर आली. गाऊ यांची गणती जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांमध्ये होऊ लागली.

राजकीय प्रवास

2016 मध्ये गाऊ हे कुओमिनतांग पार्टीत दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली. पण ते ही निवडणूक पराभूत झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही. आता ते अपक्ष उमेदवार म्हणून पुन्हा नशीब आजमावत आहेत. तैवानमध्ये जानेवारी 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गाऊ यांना चीनचे समर्थक म्हणून ओळखले जाते. वन-चायना फ्रेमवर्कवर त्यांचा जोर आहे.