मुंबई : लोकप्रिय विअरेबल ब्रँड boAtनं Iris नावानं भारतात एक नवीन स्मार्टवॉच (Smartwatch) लॉन्च केलंय. आयरिस (Iris) स्मार्टवॉचमध्ये एक राउंड डायल आहे आणि हाय डेफिनिशन HD AMOLED डिस्प्लेसह ती येते. BoAt Iris स्मार्टवॉच ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर आणि इतर विविध स्पोर्ट्स मोड यासारख्या वैशिष्ट्यांसह येते. BoAtनं काही दिवसांपूर्वी भारतात व्हर्टेक्स स्मार्टवॉच लाँच केली होती.
एचडी अॅमोलेड डिस्प्लेसह विविध फिचर्स
BoAt Irisमध्ये 462ppi हाय-डेफिनिशन AMOLED डिस्प्लेसह 1.39-इंच डायल आहे. डिस्प्ले क्रिस्प, शार्प आणि ग्राफिक्स तयार करतो. boAt Iris क्लाउड-आधारित वॉच फेस सपोर्टसह येते, फक्त तुमच्या फोनवरील boAt Hub अॅपवर जा आणि तुमच्या OOTDनुसार वॉच फेस जुळवा. घड्याळ 24×7 हृदय गती आणि SpO2 मॉनिटरसह विविध आरोग्य वैशिष्ट्यांसह येते.
boAt Iris किंमत आणि उपलब्धता
boAt Iris भारतात 4499 रुपये किंमतीत लॉन्च करण्यात आलीय. हे स्मार्टवॉच आजपासून boAt वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध होत आहे. हे घड्याळ सिलिकॉन आणि चामड्याच्या पट्ट्यामध्ये अॅक्टिव्ह ब्लॅक, फ्लेमिंग रेड आणि नेव्ही-ब्लू कलर पर्यायांमध्ये देण्यात आलंय.
सात दिवसांची बॅटरी लाइफ
स्मार्टवॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड आणि अॅक्टिव्हिटी ट्रॅकर्स येतात. तुम्हाला तुमची दैनंदिन कॅलरी बर्न, पावलं रेकॉर्ड करण्यास यामुळे मदत होते. घड्याळ 8 इंटर्नल स्पोर्ट्स मोडसह येते.चालणं, धावणं, सायकलिंग, स्किपिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल आणि पोहणं यामध्ये त्याची मदत होते. तसंच वॉच वॉटर रेसिस्टंट IP68 रेटिंगसह येते, त्यामुळे वर्कआउट सोपं जातं. याशिवाय, boAt Iris 7 दिवसांच्या बॅटरी लाइफसह येते.
सर्वात वेगानं वाढणारं विअरेबल
इमॅजिन मार्केटिंग PVT Ltd चे सह-संस्थापक आणि CMO, अमन गुप्ता म्हणाले, की मागच्या तिमाहीत नवीन IDC डेटानुसार स्मार्टवॉच सर्वात वेगानं वाढणारं विअरेबल बनलंय आणि आम्हाला ब्रँडचा पहिला AMOLED डिस्प्ले मिळालाय. ही घोषणा करताना आम्हाला आनंद होतोय. स्मार्टवॉच boAt Iris ही मार्केटमधली आमची सर्वात प्रीमियम स्मार्टवॉच आहे आणि आम्ही आमच्या सर्व boAtheadsकडून सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहोत.