‘या’ बॉलिवूड गायकाचा मोठा निर्णय; मानधन Cryptocurrency स्वरुपात देण्याची मागणी

| Updated on: Jun 20, 2021 | 9:52 AM

मी या दिशेने एक लहान पाऊल उचलले आहे. याचे सर्व श्रेय माझे व्यवस्थापक अंकित खन्ना यांना जाते. त्यांनी माझे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. (Bollywood Rapper Raftaar becomes first Indian artist to accept cryptocurrency as fees)

या बॉलिवूड गायकाचा मोठा निर्णय; मानधन Cryptocurrency स्वरुपात देण्याची मागणी
Cryptocurrency
Follow us on

Raftaar on cryptocurrency मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) लोकप्रिय ठरत आहे. अनेक किरकोळ गुंतवणूकदारही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहे. यात आता बॉलिवूडच्या एका सेलिब्रिटीचे नाव जोडले जाणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर रफ्तार (Rapper raftar) यापुढे कोणत्याही अभिनयासाठी किंवा परफॉर्मन्ससाठी क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे आकारणार आहेत. विशेष म्हणजे असा निर्णय घेणारे ते पहिले कलाकार ठरले आहेत. (Bollywood Rapper Raftaar becomes first Indian artist to accept cryptocurrency as fees)

“क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेने एक पाऊल”

“मी नेहमीच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा चाहता राहिलो आहे. देशातील बहुतांश कलाकार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे किंवा त्यातून फी घेण्याचा विचार का करत नाही, याचे मला खरतर आश्चर्य वाटते. मी या दिशेने एक लहान पाऊल उचलले आहे. याचे सर्व श्रेय माझे व्यवस्थापक अंकित खन्ना यांना जाते. त्यांनी माझे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यामुळे आता मी माझ्या अभिनयासाठी तसेच परफॉर्मन्ससाठी क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेईन,” असे रॅपर रफ्तार म्हणाले.

“येत्या जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात, रफ्तार व्हर्च्युअल परफॉर्मन्स अर्थात ऑनलाईन परफॉर्मन्स करणार आहेत. यासाठी ते क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेतील. हा कार्यक्रम 60 मिनिटांचा असून तो कॅनडामध्ये आयोजित करण्यात आला आहे. ही एक खासगी पार्टी आहे. ज्यात 100 पाहुणे सहभागी होणार आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

संगीत क्षेत्रात बरेच बदलाव

अंकित खन्ना यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी दिलेल्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानाच्या मदतीने संगीत क्षेत्रात बरेच बदल घडतील. आता कोणताही कलाकार कोणत्याही अडचणींशिवाय थेट मध्यमवर्गींयापर्यंत पोहोचू शकतील. या कामासाठी रफ्तार यांनी दिलेल्या विशेष सहकार्याबद्दल मी त्याचे आभार मानतो.

जागतिक स्तरावरील अनेक कलाकारांचा यापूर्वीच निर्णय

जागतिक पातळीवर, 50 सेंट, Mariah Carey, G-Eazy, Sia, Fall Out Boy, the Backstreet Boys and Lana Del Rey या कलाकारांनी यापूर्वीच या दिशेने पाऊल टाकले आहे.

(Bollywood Rapper Raftaar becomes first Indian artist to accept cryptocurrency as fees)

संबंधित बातम्या : 

भारतीय महिला Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करुन होऊ शकतात करोडपती, जाणून घ्या कारणं?

Share Market Outlook : ‘या’ 10 मिडकॅप शेयर्सची किंमत आठवडाभरात 22 टक्क्यांनी कमी, योग्यवेळी खरेदी करुन मालामाल व्हा

Swiss bank मधील भारतीयांच्या वाढत्या पैशांचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळलं, बँकेकडे पुरावे मागितले