Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी संसदेत भाषण करताना सरकारच्या विकास कार्याविषयी चर्चा केली. सरकार पीएम आवास योजनेतंर्गत 2 कोटी घर बनवण्याच्या दिशेने काम करत असल्याच त्यांनी सांगितलं. सरकारच्या या योजनेतंर्गत आतापर्यंत 3 कोटी घर बांधण्यात आली आहेत. गरीब भारतीयांना हक्काच घर मिळावं, या उद्देशाने सरकारने ही योजना सुरु केली. सरकारने या बजेटमध्ये मध्यमवर्गाला घर उपलब्ध करुन देणार असल्याच म्हटलं आहे. या घोषणेचा अर्थ समजून घेऊया.
लोकसभा निवडणुकीआधी मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्यासाठी घराची घोषणा केली आहे. भाड्याच्या घरात किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांना घर खरेदीसाठी मदत करण्याची घोषणा केली आहे. पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पुढच्या पाच वर्षात ग्रामीण गरीबांसाठी 2 कोटी घर बांधण्याची घोषणा केली आहे. सरकार भाड्याच्या घरात किंवा झोपडपट्टी, चाळी आणि अनधिकृत घरात राहणाऱ्या मध्यम वर्गीयांना घर बनवण्यासाठी, घरी खरेदीत मदत करण्यासाठी योजना आणणार आहे.
मध्यम वर्गाच्या घरांसाठी किती हजार कोटींची तरतूद?
केंद्रीय बजेट 2024 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निधीची तरतूद वाढवून 66 टक्के 79,000 कोटी रुपये केली आहे. यात 25,103 कोटी रुपये सर्वांसाठी घर मिशनमध्ये तेजी आणण्यासाठी पीएमएवाय-शहरीला दिले आहेत. उर्वरित पीएमएवाय-ग्रामीणला आहेत. याचाच अर्थ 25 हजार कोटी रुपयांचा वापर मिडल क्लास वर्गाला घर उपलब्ध करुन देण्यासाठी होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत किती लाखाची मदत मिळते?
प्रधानमंत्री आवास योजना अशी योजना आहे, ज्यात लाखो लोकांना आपल घर बनवण्यासाठी मदत मिळाली आहे. लोकांना या योजनेतंर्गत अडीच लाख रुपयापर्यंत मदत मिळाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा (पीएमएवाय) फायदा फक्त गरीबांना मिळायचा. पण आता शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना या कक्षेत आणलं आहे. इनकमच्या आधारावर अनेक कॅटेगरी आहेत. त्या कॅटेगरीच्या आधारावरप लोन अमाऊंट ठरवली जाते. सुरुवातीला पीएमएवाय होम लोनची रक्कम 3 ते 6 लाख रुपये होती. त्यावर सब्सिडी मिळायची.