नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : संसदेचे संक्षिप्त अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी सुरु होईल. हे बजेट 9 फेब्रुवारीपर्यंत चालेल. 17 व्या लोकसभेचे हे शेवटचे बजेट (Budget 2024) आहे. हे बजेट लोकसभेच्या तोंडावर सादर करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बजेट नवीन पायंडे पाडण्याची दाट शक्यता आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत पुनरागमण करण्याच्या तयारीनीशी निवडणूकीत उतरणार आहेत. त्यासाठी अंतरिम बजेट हा योग्य प्लॅटफॉर्म ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची चुणूक दिसल्याशिवाय राहणार नाही.
संसदीय कार्य मंत्री प्रह्लाद जोशी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची माहिती दिली. अंतरिम बजेट सत्र 2024, 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होईल असे त्यांनी सांगितले. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होईल. तर 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.
लोकसभेनंतर पूर्ण बजेट
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने शुक्रवारी संसदेचे बजेट सत्राची अधिसूचना जारी केली. यावर्षी एप्रिल ते मे महिन्यात संभाव्य लोकसभा निवडणुका होतील. या निवडणुकीनंतर नव्याने सत्तेत येणारे सरकार पूर्ण बजेट सादर करेल. निर्मला सीतारमण अंतरिम बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असतील. गेल्या काही वर्षांपासून बजेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. बजेटचा आपल्या खिशावर काय परिणाम होतो हे समजण्यासाठी सर्वांचेच लक्ष अर्थसंकल्पाकडे असते.
#InterimBudgetSession2024, last session of Seventeenth Lok Sabha to be held from 31st January to 9th February, with address of Hon’ble President to the Parliament. On 1st February, Hon’ble FM @nsitharaman ji will present the Interim Union Budget. pic.twitter.com/fF0yzblsgU
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) January 12, 2024
वित्त विधेयक होईल सादर
1 एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते. तर 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपते. केंद्रीय बजेट हा सरकारच्या आर्थिक घडामोडींचा सर्वात व्यापक दस्तावेज असतो. यामध्ये महसूल, भांडवल, खर्च यांचा समावेश असतो. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लागलीच वित्त विधेयक (Finance Bill) संसदेत सादर करण्यात येते. या अर्थसंकल्पत घोषीत कराच्या नियमांमध्ये बदलाचा प्रस्तावांचा समावेश असतो.
16 जूनपर्यंत कार्यकाळ
सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी 17 व्या लोकसभेचे शेवटचे सत्र होत आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा, 10 मार्च रोजी करण्यात आली होती. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात मतदान झाले होते.