2000 Rupee Notes
विशेष म्हणजे या टाईल्स आणि विटा सरकारी कामातही वापरल्या जातील. त्यामुळे या वीट आणि फरशा विकून तुम्हाला चांगला व्यवसाय करता येणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे शहरातील प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. ही योजना ग्रेटर नोएडामध्ये सुरू करण्यात आली आगे.
साडेचार एकर क्षेत्रात याचं काम सुरू केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रेटर नोएडा अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, दररोज टनभर कचरा शहरातून बाहेर पडतो. या कचरामध्ये बांधकाम साइट कचरा देखील आहे.
सहसा हा कचरा एका ठिकाणाहून उचलला जातो आणि दुसर्या जागी फेकला जातो. पण आता असं होणार नाही. इकोटेक सेक्टर -3 मध्ये एक प्लांट उभारला जात आहे.
ही कंपनी दररोज 100 टन कचर्यापासून विटा आणि फरशा तयार करेल. लवकरच त्याची क्षमता 300 टन करण्यात येईल.
घर, ऑफिस आणि हॉटेल-रेस्टॉरंटमधून कंपनी उचलणार कचरा! - ग्रेटर नोएडा अथॉरिटी आणि कंपनी यांच्यातील करारानुसार कंपनी घर, ऑफिस, हॉटेल-रेस्टॉरंट्स, सार्वजनिक ठिकाण आणि बांधकाम साइटवरून कचरा गोळा करू शकते. पण यासाठी कंपनी दरमहा एक निश्चित शुल्कदेखील आकारणार आहे.
दरम्यान, शहरातील कचरा उचलण्यासाठी एक सेंटरही तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये शहरातल्या 10 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.