नवी दिल्ली : देशात असे असंख्य व्यवसाय आहेत जे तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता आणि त्यातून बक्कळ पैसा कमवू शकता. यातलाच एक व्यवसाय म्हणजे डेअरी उत्पादनाचा व्यवसाय आहे. दुग्धजन्य पदार्थ असे आहेत की ज्यांचा दररोज वापर केला जातो. यामुळे यामध्ये जास्त नफा आहे. अशात दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात तुम्ही फक्त 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतच दरमहा 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता. (business idea start dairy business with 5 lakhs rs and per month earn 70000 pm mudra loan yojana will help you)
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारही तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे तुम्हीही जर हा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहे. तर जाणून घेऊयात संपूर्ण प्रक्रिया….
मुद्रा कर्ज योजनेंतर्गत मिळेल कर्ज
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक धोरणं पक्कं असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळीच पैशांची जुळवणी करणं महत्त्वाचं आहे. यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण, मोदी सरकारच्या पंतप्रधान मुद्रा लोन योजनेमुळे तुम्ही सहज व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता.
एकूण गुंतवणुकीच्या 70% दिलं जाईल कर्ज
जर तुम्हालाही या व्यवसायाला सुरुवात करायची असेल आणि यासाठी तुम्ही कर्ज घेणार असाल तर मुद्रा कर्जामधून बँकेला एकूण खर्चाच्या 70 टक्के रक्कम मिळेल.
5 लाख रुपये करावे लागतील खर्च
खरंतर, प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार हा व्यवसाय 16 लाख 50 हजार रुपयांपर्यंत तयार केला जाऊ शकतो. पण यामध्ये एखाद्या व्यक्तीला फक्त 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
असा असेल प्रोजेक्ट
पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रकल्पानुसार, या व्यवसायात एका वर्षात 75 हजार लिटर दुधाची विक्री होऊ शकते. इतकंच नाहीतर 36 हजार लिटर दही, 90 हजार लिटर लोणी आणि 4500 किलो तूपही विकलं जाऊ शकतं. यामुळे याचा जर हिशोब केला तर सुमारे 82 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल व्यवसायात तुम्हाला करता येईल. ज्यामध्ये सुमारे 74 लाख रुपये खर्च येईल. यामध्ये तुम्ही 14 टक्के व्याज कपात करूनही तब्बल 8 लाखांची बचत करू शकता.
या व्यवसायाला सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 चौरस फूट जागा आवश्यक आहे. ज्यामध्ये 500 चौरस फूट जागा काम करण्यासाठी, रेफ्रिजरेशन 150 चौरस फूट, वॉशिंग 150 चौरस फूट, ऑफिस, शौचालय आणि इतर सुविधांसाठी 100 चौरस फूट जागा आवश्यक आहे. (business idea start dairy business with 5 lakhs rs and per month earn 70000 pm mudra loan yojana will help you)
संबंधित बातम्या –
Business Idea : फक्त 50 हजारात सुरू करा व्यवसाय, महिन्याला भरभरून कमवाल
नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये
घर बसल्या परदेशात सुरू करा व्यवसाय, ‘या’ गोष्टी केल्या तर बक्कळ पैसा कमवाल
Special Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल
फक्त 50 हजार लावून कमवा 2.50 लाख, आताच सुरू करा डबल फायदा असलेला ‘हा’ बिझनेस
(business idea start dairy business with 5 lakhs rs and per month earn 70000 pm mudra loan yojana will help you)