केंद्र सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त आहे देशाच्या ‘या’ तीन कंपन्यांची संपत्ती!

| Updated on: Jan 18, 2021 | 8:37 AM

भारतातील अशा तीन कंपन्या ज्यांची मार्केट कॅप 32 लाख कोटींपेक्षा जास्त आहे, तर केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये या कंपन्यांचा खर्चच 30.42 लाख कोटी रुपये इतका होता.

केंद्र सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त आहे देशाच्या या तीन कंपन्यांची संपत्ती!
Follow us on

नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात बड्या तीन कंपन्यांची संपत्ती केंद्र सरकारच्या बजेटपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील अशा तीन कंपन्या ज्यांची मार्केट कॅप 32 लाख कोटींपेक्षा जास्त आहे, तर केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये या कंपन्यांचा खर्चच 30.42 लाख कोटी रुपये इतका होता. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) या तीन कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या भांडवलाच्या बाबतीत पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत. (business news 3 companies market cap is more than budget of the central government)

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 12.28 लाख कोटी रुपये इतकी आहे. तर टीसीएसचे बाजार भांडवल 12.13 लाख कोटी रुपये आहे आणि एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 8.07 लाख कोटी रुपये आहे. आता तुम्ही या तिन्ही रक्कमेला एकत्र केलं तर ही रक्कम भारत सरकारच्या बजेटपेक्षा 32 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

टाटा समूहाचे मार्केट कॅप 17 लाख कोटी

टाटा कंपनीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मार्केटमध्ये भारतातील आघाडीचा कॉर्पोरेट ग्रुप टाटा पहिल्या क्रमांकावर आहे, तर एचडीएफसी आणि रिलायन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा कंपनी समूहाची मार्केट कॅप सुमारे 17 लाख कोटी रुपये आहे तर एचडीएफसी समूहाची बाजारपेठ सुमारे 15 लाख कोटी रुपये आहे.

एका वर्षात 42 टक्क्यांनी घेतली उडी

केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूहाचं काम गेल्या वर्षापासून खूपच चांगलं सुरु आहे. यामुळे मार्केटमध्येही त्यांची मागणी वाढली असून मागील एका वर्षात सुमारे 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अजय केडिया यांच्या माहितीनुसार, टाटा समूहाच्या 28 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 18 कंपन्या गेल्या महिन्यात खूपच दमदार राहिल्या. 2021 मध्ये टाटाच्या समभागांच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (business news 3 companies market cap is more than budget of the central government)

संबंधित बातम्या – 

अद्याप नाही आला इनकम टॅक्स रिफंड? पैसे खात्यात मिळवण्याची ‘ही’ आहे पद्धत

SBI बँकेची अनोखी सुविधा, पैसे भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, बँक कर्मचारी घरी येणार

(business news 3 companies market cap is more than budget of the central government)