नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी (60 वर्षांवरील लोक) मुदत ठेव (FD) करण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे, वृद्धांच्या सोयीसाठी आणलेल्या ‘एसबीआय विकेअर डिपॉझिट’ (SBI Wecare Deposit) अंतर्गत 30 जून 2021 पर्यंत अतिरिक्त व्याजदराचा लाभ घेता येईल. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती घेण्यात आली आहे. एसबीआयने या योजनेचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवला आहे. (business News savings and investments sbi wecare deposit scheme extended till 30th june 2021)
ट बँक ऑफ इंडियाने (SBI) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेची मुदत (Special Fixed Deposit Scheme) तिसऱ्यांदा वाढवली आहे. मे महिन्यात, बँकेने एसबीआय विकेअर (SBI WECARE) ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना जाहीर केली, जी सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत होती. ही योजना डिसेंबरच्या अखेरीस पुन्हा वाढवण्यात आली, जी पुन्हा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली. आता ती तिसऱ्यांदा 30 जून 2021 करण्यात आली आहे.
कोरोनो व्हायरस साथीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याज दरासाठी विशेष एफडी योजना सुरू केली गेली. बँकेने विशेष एफडी योजना तीन महिन्यांसाठी 30 जूनपर्यंत वाढवली आहे. विशेष एसबीआय विकेअर डिपॉझिट (SBI Wecare Deposit) योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज दिले जाते.
FD वर 0.80% अधिक व्याज
या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.30 टक्के जादा व्याज मिळते. त्याचबरोबर एसबीआय सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच 0.50 टक्के जादा व्याज देत आहे. अशा प्रकारे, एसबीआय विकेअर ठेवीचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिक त्यांच्या एफडीवर 0.80 (0.50+0.30) टक्के अधिक व्याज घेऊ शकतात.
योजनेची वैशिष्ट्ये
– 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
– ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे.
– मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
– एसबीआय विकेअर ठेवीअंतर्गत नवीन एफडी खाते उघडणे किंवा जुन्या एफडी नूतनीकरण या दोन्ही बाबींवर जास्त व्याजाचा लाभ मिळू शकेल.
– एसबीआयची ही योजना आता 30 जून 2021 पर्यंत खुली आहे.
business News, savings and investments, sbi, wecare deposit scheme, 30th june 2021,
एसबीआय सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या एफडीवर 5.4 टक्के व्याज देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेत निश्चित ठेव ठेवली असेल तर एफडीला लागू असणारा व्याज दर 6.20 टक्के असेल. (business News savings and investments sbi wecare deposit scheme extended till 30th june 2021)
संबंधित बातम्या –
घर बसल्या कमवा 25 लाख रुपये, 1, 5 आणि 10 रुपयांची नाणी विकून ‘असे’ व्हा लखपती
आता विमा प्रीमियमवर करा मोठी बचत, ‘या’ 5 पद्धतीने मिळवा कॅशबॅक
1 लाखात सुरू करा ‘हा’ बिझनेस, प्रत्येक महिन्याला कमवाल 8 लाख रुपये
(business News savings and investments sbi wecare deposit scheme extended till 30th june 2021)