नवी दिल्ली : नवीन वर्षात जर तुम्हाला घर, दुकान आणि इंडस्ट्रिअल प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. खरंतर, देशातील सगळ्यात मोठी दुसरी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) पुन्हा एकदा मालमत्ता लिलाव करणार आहे. पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, हा ई-लिलाव (PNB e-auction) 8 जानेवारी 2021 ला सुरू होणार आहे. ज्यासंबंधी बँकेकडून एक ट्वीटदेखील करण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लिलावामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हालाही घर विकत घ्यायचं असेल किंवा त्यात गुंतवणूक करायची असेल तर ही एक उत्तम संधी आहे. (buy house in mumbai pnb e auction of properties check date and eligibility details)
बँकांकडून वेळोवेळी अशा मालमत्तेचा लिलाव केला जातो. बँक कर्जाच्या बाबतीत, जे लोक डीफॉल्टमध्ये असतात त्यांच्या मालमत्तेवर बोली लावली जाते. अशा लिलावासाठी इंडिया बँक असोसिएशनने इंडियन बँक लिलाव मालमत्ता माहिती (IBAPI) पोर्टलही तयार केलं आहे. जर एखादी बँक लिलाव प्रक्रियेतून गेली तर त्याची माहिती इथे दिली जाते.
किती मालमत्तांचा होणार लिलाव
पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, 8 जानेवारी रोजी ज्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे, त्यामध्ये 3169 निवासी, 902 व्यावसायिक, 485 औद्योगिक आणि 12 कृषी मालमत्तांचा समावेश आहे. लिलावापूर्वी देण्यात आलेल्या माहितीमध्ये, मालमत्तेबद्दलची सर्व आवश्यक माहिती संभाव्य खरेदीदारास दिली जाते. यामध्ये मालमत्तेची माहिती, आकार आणि इतर माहिती देण्यात आलेली असते. इतकंच नाही तर या मालमत्तांविषयी माहिती देण्यासाठी बँक शाखेमध्ये एखाद्या व्यक्तीची नेमणूक देखील केली जाते.
Looking to invest in property? Get reasonable prices of residential & commercial property through PNB e-Auction being held on 8th January, 2021
To know more, visit e-Bikray Portal : https://t.co/N1l10s1hyq pic.twitter.com/ENjHORylEC
— Punjab National Bank (@pnbindia) January 5, 2021
इथे मिळणार लिलावासंदर्भातील माहिती
सध्या लिलाव होत असलेली मालमत्ता खरेदी करण्याचा फायदा म्हणजे याची तुम्हाला योग्य किंमत मिळेल. लिलाव होत असलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला आयबीएपीआयच्या अधिकृत वेबसाइट https://ibapi.in/ वर भेट द्यावी लागेल.
लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काय कराल?
– लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
– ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉजिट म्हणजे EMD जमा करणे बंधनकारक आहे.
– संबंधित बँकेच्या जवळच्या शाखेत तुमची कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे.
– लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ई-सिग्नेचर आवश्यक.
– EMD आणि KYC जमा केल्यानंतर ई-ऑक्शन करणाऱ्या संस्थेकडून तुम्हाला ईमेल आयडी आणि लॉगिन पासवर्ड पाठवला जाईल. त्यानंतर तुम्ही पोर्टलवर लॉगिन करून ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. (buy house in mumbai pnb e auction of properties check date and eligibility details)
संबंधित बातम्या –
लखपती व्हायचंय… मग मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा
Loan Moratorium: RBI गव्हर्नर आणि SBI अधिकाऱ्यांविरोधात याचिका; कोर्टाचा निर्णय काय?
(buy house in mumbai pnb e auction of properties check date and eligibility details)