नवी दिल्लीः मोदींच्या मंत्रिमंडळाने वस्त्रोद्योगासाठी मित्रा योजना मंजूर केलीय. या योजनेंतर्गत देशभरात 7 मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. टेक्सटाईल मेगा पार्कसाठी सुमारे 4500 कोटी रुपये खर्च केले जातील. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अनुराग सिंह ठाकूर यांनी आजच्या बैठकीत वस्त्रोद्योगासाठी काही घेतलेल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाकूर म्हणाले की, वस्त्रोद्योगासाठी पीएम मित्र योजना सुरू करण्यात आलीय, यासाठी देशभरात 7 मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. तसेच यावर 4445 कोटी खर्च केले जातील. यामुळे कापड आणि उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती होईल. पीयूष गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योगात निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने सात मोठे निर्णय घेतलेत. यापैकी सहा निर्णय आधीच घेतले गेलेत. आज या उद्योगासाठी सातवा निर्णय घेण्यात आला.
पीयूष गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योगासाठी आज पीएम मित्र योजना सुरू केली जात आहे. सरकार यासाठी ‘5F’ संकल्पनेवर काम करीत आहे. सध्या वस्त्रोद्योग एकात्मिक नाही. यामध्ये उत्पादन इतरत्र होते, कच्चा माल कुठेतरी येतो. अशा प्रकारे त्याची किंमत लक्षणीय वाढते. टेक्सटाईल पार्कच्या मदतीने कापड उद्योगासाठी सर्व कामे एकत्रित केली जातील.
Union Cabinet approves setting up of 7 PM Mega Integrated Textile Region & Apparel (PM MITRA) parks with a total outlay of Rs 4,445 crores over 5 years. Move inspired by 5F vision of PM Modi – Farm to Fibre to Factory to Fashion to Foreign: Union Commerce Minister Piyush Goyal pic.twitter.com/AkXHUP5xxO
— ANI (@ANI) October 6, 2021
पुढील पाच वर्षात यासाठी 4445 कोटी खर्च केले जातील. 10 राज्यांनी सात टेक्सटाईल पार्कसाठी स्वारस्य दाखवले. जेव्हा हे उद्यान तयार होईल, तेव्हा 7 लाख प्रत्यक्ष आणि 14 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. उद्यान तयार करण्यासाठी सुमारे 1700 कोटी रुपये खर्च केले जातील. हे उद्यान 1000 एकरांवर पसरलेले असेल. पीयूष गोयल म्हणाले की, हे टेक्सटाईल पार्क राज्यातील ग्रीनफिल्ड आणि ब्राऊनफिल्ड भागात बांधले जातील. ग्रीनफील्ड MITRA पार्कला 500 कोटी आणि ब्राऊनफिल्ड MITRA पार्कला 200 कोटी दिले जातील. येथे काम करणाऱ्या कामगारांना सर्व सामाजिक सुरक्षेचे योग्य फायदेही मिळतील.
केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये कापडांबाबत दोन मोठे निर्णय घेतलेत. पहिला PLI बद्दल आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, भारतातील नोंदणीकृत उत्पादन कंपन्या वस्त्रोद्योग क्षेत्रात 10,683 कोटी रुपयांच्या उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन (PLI) चा लाभ घेऊ शकतात.
संबंधित बातम्या
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बोनसची आज घोषणा होणार, किती पैसे मिळणार?
ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांनो लक्ष द्या, आता कॉन्टॅक्टलेस पेमेंट करा
Cabinet Decision Updates: Big announcement for textile industry, 4445 crore will be received under MITRA scheme