नवी दिल्लीः सर्व भारतीय नागरिकांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे ओळखपत्रापेक्षा कमी नाही. सरकारी व्यवहारापासून ते वैयक्तिक वित्त या सर्व गोष्टींसाठी आपल्याला या कार्डची आवश्यकता आहे. आधार कार्डधारकांना एक 12 क्रमांकांचा आधार क्रमांक मिळतो, जो युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI ) जारी केलाय. त्यात व्यक्तीची सर्व संवेदनशील माहिती असते आणि म्हणूनच फसवणुकीसारख्या हालचालींचा जास्त धोका असतो.
म्हणूनच इतरांना त्यांचा अनोखा ओळख क्रमांक माहीत असला तर त्यांना काही त्रास होऊ शकतो का? याबद्दल लोक थोडेसे घाबरलेत. ज्या लोकांनी आपले बँक खाते आधारशी जोडले आहे, अशा लोकांना काळजी वाटते की त्यांचे आधार खाते माहrत असलेल्या एखाद्या व्यक्तीद्वारे त्यांचे बँक खाते हॅक केले जाऊ शकते की नाही.
यूआयडीएआयने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. लोकांना सांगितले की, हे सत्य नाही आणि काळजी करण्याची गरज नाही. आपला एटीएम कार्ड नंबर जाणून घेतल्याप्रमाणे कोणीही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकत नाही. तशाच प्रकारे आपला आधार नंबर जाणून घेतल्यास कोणीही आपले बँक खाते हॅक करू शकत नाही किंवा पैसे काढू शकत नाही.
UIDAI ने म्हटले आहे की, जर तुम्ही बँकांनी दिलेला तुमचा पिन/ओटीपी कोणाबरोबर शेअर केला नाही, तर तुमचे बँक खाते सुरक्षित आहे. केवळ आधार क्रमांक बँकिंग किंवा इतर कोणत्याही सेवेसाठी वापरला जाऊ शकत नाही.
आर्थिक फसवणुकीचा बळी पडू नये म्हणून यूआयडीएआयने वापरकर्त्यांना आधार कार्ड नंबर ऑनलाईन लॉक करणे आणि अनलॉक करण्याची विशेष सुविधा दिली. व्हर्च्युअल आयडी प्रमाणीकरण आवश्यक असेल म्हणून हे नवीन ‘आपला आधार नंबर लॉक करा आणि अनलॉक करा’ वैशिष्ट्य कोणालाही आपल्या आधार कार्ड नंबरचा दुरुपयोग करण्यास अनुमती देणार नाही.
>> आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 1947 वर एसएमएस पाठवा, त्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल. तुमच्या आधार कार्ड नंबरच्या शेवटच्या चार अंकानंतर एसएमएस GETOTP असावा.
>> एकदा तुम्हाला ओटीपी मिळाल्यावर LOCKUID फॉरमॅटमध्ये दुसरा एसएमएस पाठवा त्यानंतरच्या शेवटच्या चार अंकी ओटीपी आणि आपल्या आधार कार्ड क्रमांकाचे सहा अंक असावेत.
>> पहिल्या दोन टप्पे पूर्ण झाल्यावर UIDAI आपला आधार कार्ड नंबर लॉक करेल, त्यानंतर तुम्हाला त्याकरिता एक पुष्टीकरण संदेश देखील मिळेल.
संबंधित बातम्या
एकदाच 1 लाख गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा 8 लाखांची कमाई, सरकारचीही मदत
SBI वारंवार का जारी करते 4 अलर्ट, तुमचेही खातेही असल्यास नक्की वाचा
Can someone hack your bank account with your Aadhaar number? UIDAI gave this answer