गेल्या महिन्यातील कार विक्रीचा (car sales) डाटा जाहीर करण्यात आला आहे. चिप आणि शॉर्टेजच्या कमतरतेमुळे एप्रिलमधील कार विक्रीच्या आकड्यांमध्ये (figures) काहीशी घसरण झाली असली तरी, यात काही भारतीय कार निर्मात्या कंपन्या अशाही आहेत, ज्यांनी आपल्या कार विक्रीचा रेकॉर्डब्रेक केला (Record break) आहे. शिवाय काही इतर ब्रँडदेखील आपल्या कार विक्रीच्या आलेखात स्थान पक्के करत आहेत. गेल्या महिन्यात कोणत्या कंपन्यांच्या किती कार विक्री झाल्या, कोणत्या कंपन्यांनी रेकॉर्डब्रेक केलाय, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
1) मारुती सुझुकी : देशात सर्वाधिक कार विकणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. एप्रिल 2022 मध्ये 1 लाख 21 हजार 995 युनिट्स विकण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात, 10.22 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मारुतीने 1 लाख 35 हजार 879 युनिट्स विकले होते. मारुतीच्या एंट्री लेव्हल कार अल्टो आणि एस-प्रेसोमध्ये मोठी पडझड झालेली दिसत आहे. मार्चमध्ये कंपनीने मिनी सेगमेंच्या 17134 युनिट्सची विक्री केली होती.
2) ह्यंडाई : चिप आणि पार्टस्च्या कमतरतेचा परिणाम कंपनीच्या सेल्सवरही दिसून आला. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये 10 टक़्के कमी गाड्यांची विक्री नोंदवली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 44001 गाड्यांची विक्री केली होती. तर मार्चमध्ये 44600 कार विक्री झाल्या होत्या. एक्सपोर्टमध्ये कंपनीला फायदा झालेला आहे. कंपनीने एप्रिलमध्ये 12200 कार एक्सपोर्ट केल्या होत्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 19.60 टक्के वाढ झालेली आहे.
3) टाटा : टाटा मोटर्सने आपल्या कारच्या विक्रीत दुप्पट वाढ केली आहे. कार विक्रीत होत असलेल्या सातंत्याच्या वाढीमुळे टाटा, ह्युंडाईला पिछाडीवर टाकून दुसर्या क्रमांकावर येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. टाटाने एप्रिल 2021 मध्ये 25095 पॅसेंजर कार विकल्या आहेत. तर या वर्षी तब्बल 41587 कार विक्री केली केली आहे. टाटाने एप्रिल 2022 मध्ये तब्बल 2322 इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे.
4) टोयोटा : एप्रिलमध्ये कंपनीने एकूण 15085 कार युनिट्स विक्री केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा जास्त असल्याचं सांगण्यात आले आहे. एप्रिल 2021 मध्ये कंपनीने 9600 कारची विक्री केली होती. तर कंपनीच्या म्हणण्यानुसार, टोयोटा क्रिस्टा, फॉच्यूनर, लीजेंडर अशा कार्सना खूप मागणी वाढली आहे.