नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Governments Employee) नव्या वर्षात सरकारकडून वेतनवाढीचं (Salary Hike) गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांत (Dearness Allowance- DA) वाढ करण्याचे संकेत सरकारी गोटातून मिळत आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या अहवालानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या निकषानुसार 3 टक्के महागाई भत्त्यांत वाढ करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सुधारित वेतनानुसार किमान 20 हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, महागाई भत्त्यांत वाढीच्या निर्णयाबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना देणाऱ्या डीए अर्थात एक कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्समधअये वर्षातून दोनदा वाढ करण्यात येते. जानेवारी आणि जुलै महिन्यांत डीएमधील बदल घोषित केले जातात. महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना डीए अदा केला जातो. भारतासोबतच बांग्लादेश आणि पाकिस्तान सारख्या राष्ट्रांतही डीएची तरतूद दिसून येते.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता अदा केला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांत जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांत डीएमध्ये दोन वेळा वाढ करण्याक आली. 47.14 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना 31 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात आला. जुलै 2021 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यांत 17 टक्क्यांवरुन 28 टक्के केला. सरकारी सुत्रांनुसार केंद्र सरकारने महागाई भत्त्यांत तीन टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात फरक दिसून येईल. सरकारने यानुसार महागाई भत्त्यांत वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन 8 हजार रुपयांनी वाढ होऊन 28 हजारांपर्यंत पोहोचू शकते.
(Dearness Allowance) महागाई भत्त्याची गणना कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या आधारावर केली जाते. शहरी, निम शहरी तसेच ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांत फरक असतो. डीएची गणना मूळ वेतनावर केली जाते. महागाई भत्त्याची गणना करण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येतो.
इतर बातम्या :