नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : चंद्रावर भारताने विक्रम केला. विक्रम लँडर बुधवारी, 23 ऑगस्ट 2023 रोजी सांयकाळी 6:04 मिनिटांनी यशस्वीपणे उतरले. भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा (Chandrayaan 3 Landing) भारत हा जगातील पहिला देश ठरला. या मोहिमेत अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांचे शेअर चांगली कामगिरी करतील, ही अपेक्षा शेअर बाजाराला (Share Market) गेल्या काही दिवसांपासून होती. त्यानुसार, काल बाजारात या शेअर्संनी चमकदार कामगिरी बजावली. या शेअरमध्ये जोरदार उसळी आली. या शेअर्संनी बाजारात रेकॉर्ड केला. त्यामुळे गुंतवणूकदारांना चंद्रयान-3 मोहिमेचा द्विगुणित आनंद झाला. हे शेअर आता अजून धावतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रोने भविष्यात अनेक मोहिमा आखल्या आहेत. त्याचा फायदा या कंपन्यांना नक्कीच होणार आहे.
या क्षेत्रातील कंपन्यांना फायदा
चंद्रयान मोहिमेबाबत अवघा देश एक झाला होता. सॉफ्ट लँडिंगसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. प्रार्थना सुरु होत्या. अपेक्षेप्रमाणे सॉफ्ट लँडिंग झाले. लँडर विक्रम उतरले आणि त्यासोबतचे रोव्हर प्रज्ञान पण उतरले. शेअर बाजाराचे संपूर्ण लक्ष या घडामोडींकडे होते. विमान, अंतराळ आणि रक्षा क्षेत्र, एअरोस्पेस, अंतराळ तंत्रज्ञान, इंधनपूर्ती, इलेक्ट्रॉनिक्स, तांत्रिक उत्पादनं करणाऱ्या कंपन्या यांच्यावर या घडामोडींचा थेट परिणाम दिसून आला. या क्षेत्रातील शेअरमध्ये मोठी उलथापालथ झाली.
14.91 टक्के उसळी
कमाईच कमाई
2040 पर्यंत भारताची मून इकॉनॉमी जोरदार असेल. चंद्राची अर्थव्यवस्थेत भारत आता अग्रेसर होईल. त्यामाध्यमातून मोठी कमाई साधता येईल. जवळपास 4200 कोटींची कमाई होण्याचा अंदाज आहे. चंद्रापर्यंत जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यवस्था झालेली असेल. त्यामाध्यमातून नियमीत कालावधीत यान ये-जा करतील. ही दळणवळण व्यवस्था 42 अब्ज डॉलरवर पोहचेल. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या शेअर बाजारात दादा असतील हे वेगळं सांगायला नको.
भारताला मोठी संधी
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झेंडा रोवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भविष्यात इतर देश मोहिमा आखतील. तोपर्यंत भारताला मोठी संधी आहे. अमेरिका, रशिया आणि चीनने यापूर्वी चंद्रावर स्वारी केली आहे. पण दक्षिण ध्रुवावर त्यांना मजल मारता आलेली नाही. रशियाचा आताचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे अवकाश आणि अंतराळ क्षेत्रात भरारी घ्यायला भारताला मोठी संधी आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.