chandrayaan 3 update | चांद्रयान 3 बद्दल एक बातमी, 145 मिनिटात ‘या’ कंपनीची 1166 कोटींची कमाई

| Updated on: Sep 21, 2023 | 3:17 PM

chandrayaan 3 update | उद्या बॅटरी चालली, तर 'या' कंपनीला लॉटरी लागेल ?. चांद्रयान-3 च्या यशामध्ये अनेक भारतीय कंपन्यांच योगदान आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढू दिसून आली आहे. इस्रोने चांद्रयान-3 मिशनमध्ये पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला.

chandrayaan 3 update | चांद्रयान 3 बद्दल एक बातमी, 145 मिनिटात या कंपनीची 1166 कोटींची कमाई
Moon Mission
Follow us on

मुंबई : चांद्रयान-3 ने चंद्रावर 23 ऑगस्टला यशस्वी लँडिंग केलं. आता 22 सप्टेंबरला चंद्रावर पुन्हा दिवस उजाडेल. चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस सूर्यप्रकाश असतो. इस्रोने टि्वट करुन ही माहिती दिलीय. चांद्रयान-3 मिशनच्या यशामध्ये अनेक भारतीय कंपन्यांच योगदान आहे. सध्या चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर ही दोन उपकरण आहेत. ही दोन्ही उपकरण सूर्यप्रकाशावर चालतात. त्यांना सौर ऊर्जेची गरज असते. त्यामुळे लँडिंगनंतर 10 दिवसांनी या दोन्ही उपकरणांना स्लीप मोडमध्ये टाकण्यात आलं होतं. आता उद्या शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश येईल. त्यावेळी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सुरु करण्याचा प्रयत्न होईल. चांद्रयान-3 च्या यशामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच योगदान आहे. गुरुवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 2 टक्क्याने हे शेअर्स वाढले.

गुरुवारी सकाळी मार्केट उघडलं, त्यावेळी भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या शेअर्समध्ये उसळी दिसून आली. सकाळी 9.15 ते 11.40 दरम्यान कंपनीचा शेअर 126.30 रुपयांवर पोहोचला. या दरम्यान कंपनीच मार्केट कॅप 43055 कोटी रुपयावरुन 44221 कोटी रुपयांवर पोहोचलं. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1166 कोटी रुपयांची वाढ झाली. चांद्रयान-3 च्या यशामध्ये अनेक सरकारी कंपन्यांच योगदान होतं. यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच महत्त्वाच योगदान होतं.

BHEL योगदान काय?

चांद्रयान-3 मिशनमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने बॅटरीचा पुरवठा केला होता. कंपनीने मिशनसाठी बॉय मॅटेलिक एडेपडर्सचा पुरवठा केला होता. चांद्रयान-3 ला चंद्राच्या पुष्ठभागावर उतरवण्यासाठी इस्रोने स्वदेशी टेक्नोलॉजी विकसित केली. टायटेनियम प्रोपेलेंट टँक तसेच प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्युलला लागणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मिती केली होती. त्यामुळेच चंद्रावर चांद्रयान-3 च यशस्वी लँडिंग शक्य झालं. चंद्रावर मायनस 200 मध्ये तापमान असतं. या वातावरणात उपकरण गोठून जातात. उद्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कमाडं दिल्यानंतर सुरु झाले, तर ती एक मोठी बाब ठरेल. इस्रोने दोन्ही उपकरणांची निर्मिती सौर ऊर्जेवर कार्यरत राहतील अशा पद्धतीने केली होती. दोन्ही उपकरणांच आयुष्य 14 दिवस होतं. उद्या कमांड दिल्यानंतर ही उपकरण चालू झाली, तर ते सुद्धा एक मोठ यश असेल. अशावेळी काही कंपन्यांचे शेअर्स वधारु शकतात.