नवी दिल्ली : नोकरदार लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात 1 सप्टेंबरपासून जर तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) तुमच्या आधार कार्डाशी जोडलेला नसेल, तर तुमचा नियोक्ता तुमच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात क्रेडिट करू शकणार नाही. वास्तविक कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (EPFO) 1 सप्टेंबर 2021 पूर्वी यूएएन क्रमांकाशी आधार जोडणे आवश्यक आहे.
सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम 142 अंतर्गत पीएफ खात्याला आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुमचा आधार तुमच्या UAN शी जोडलेला नसेल तर तुमचा नियोक्ता (काम करत असलेली कंपनी) तुमच्या EPF खात्यात मासिक PF योगदान जमा करू शकणार नाही. तसेच जोपर्यंत लिंकिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकणार नाही किंवा तुमच्या EPF कॉर्पसमधून पैसे काढू शकणार नाही.
जर या नियमाचे पालन केले नाही तर, नियोक्त्याकडून मासिक ईपीएफ योगदान न मिळाल्यामुळे ईपीएफओच्या इतर काही सेवा देखील मिळू शकणार नाहीत. यामुळे पेन्शन फंडातील तुमच्या योगदानावरही परिणाम होईल. सेवानिवृत्ती निधीचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड भविष्य निर्वाह निधी खात्याशी जोडणे अनिवार्य आहे. ईपीएफओने जूनमध्ये इलेक्ट्रॉनिक चालान आणि रिटर्न (ईसीआर) दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केलाय. ज्या कर्मचाऱ्यांचे आधार यूएएनशी जोडलेले आहे, त्यांनी फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच ईसीआर भरण्याची परवानगी दिलीय.
ईपीएफओने नियोक्त्यांना सेवांच्या अखंड प्रवेशासाठी आधार यूएएनशी जोडलेले असल्याची खात्री करण्यास सांगितले. जर यूएएनशी आधार लिंक न केल्यास कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात रक्कम जमा झाली नाही तर ते त्या रकमेवरील व्याजही गमावतील.
>> आधी तुम्ही EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
>> यासाठी या लिंकवर क्लिक करा, https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
>> यानंतर आता तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
>> मग आता तुम्हाला मॅनेज विभागात केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> आता तुम्हाला ईपीएफ खात्याशी आधार लिंक करण्यासाठी अनेक कागदपत्रे दिसतील.
>> तुम्ही आधार पर्याय निवडा आणि आधार कार्डवर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचे नाव टाईप केल्यानंतर सेवावर क्लिक करा.
>> यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित असेल आणि तुमचे आधार UIDAI च्या डेटासह पडताळणी केली जाईल.
>> तुमचे KYC दस्तऐवजबरोबर असल्यास तुमचे आधार तुमच्या EPF खात्याशी जोडले जाईल आणि तुम्हाला तुमच्या आधार माहितीसमोर “Verify” लिहिलेले मिळेल.
संबंधित बातम्या
PHOTO | वाईट काळातही उपयुक्त ठरेल तुमचे ई-श्रम कार्ड, मिळतील लाखोंचे फायदे
डिसेंबरपर्यंत येऊ शकते आरबीआयची स्वतःची क्रिप्टोकरन्सी! गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान
Changes in PF rules from next month, check the information immediately otherwise you will not get EPF payment