नवी दिल्ली : सोने आणि चांदीचे भाव गेल्या एक दोन महिन्यांपासून सातत्याने आगेकूच करत आहेत. या भावांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान या भावांमध्ये थोडीफार घसरण होते. पण ही घसरण काही काळासाठी असते. अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढविण्यात आली आहे. या दमकोंडीमुळे डॉलर घसरला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Update) भडकल्या आहेत. सध्या सोन्या-चांदीचे दर ऐतिहासिक स्तरावर आहेत. ग्राहकांना घसरणीचा फायदा घेता येतो. त्यांना आज स्वस्तात दागिने खरेदीची मोठी संधी आहे.
भाव आता सोमवारी
गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रति तोळा 55,950 रुपये आहे तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,020 रुपये आहे. 110 रुपयांची प्रति तोळा घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळी सोने- चांदीचे भाव जाहीर झाले नाहीत. काल एक किलो चांदी 76,600 रुपये होती. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत. आता भाव सोमवारी जाहीर करण्यात येईल.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 158 रुपये स्वस्त होऊन 60623 रुपये, 23 कॅरेट सोने 158 रुपये स्वस्त होऊन 60380 रुपये, 22 कॅरेट सोने 144 रुपये सस्त झाले. याचा भाव 55531 रुपये, 18 कॅरेट सोने 119 रुपये स्वस्त झाले. याची किंमत 45467 रुपये तर 14 कॅरेट सोने 90 रुपया सस्त होऊन 35467 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
चांदीपण स्वस्त
सर्वकालीन भावापेक्षा सोने 158 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. सोने 5 एप्रिल 2023 रोजी प्रति तोळा 60,781 रुपये होते. तर चांदी 79,980 रुपये प्रति किलो होती. सध्या चांदीचा भाव 76,600 रुपये आहे. चांदी पण स्वस्त झाली आहे.
शुद्ध सोन्याची हमी
सोन्याची हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेची हमी देते. त्यामुळे तुम्हाला खरे आणि खोटे सोने याच्यातील फरक, तफावत लक्षात येते. देशात सोन्याच्या शुद्धतेसाठी आता हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे दागिने, आभुषणे तयार करण्यासाठी आता 22 कॅरेट सोन्याचा वापर, उपयोग करणे आवश्यक आहे. हे सोने 91.6 टक्के शुद्ध असते. त्यामुळे तुमची फसवणूक होत नाही.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
किती शुद्धता