नवी दिल्ली : जुलै महिन्यात सोने-चांदीने दरवाढीची (Gold Silver Price Today) सलामी दिली आहे. आठवडभरात तीन वेळा सोन्यात दरवाढ झाली. तर एकदा घसरण झाली. चांदीत पण घसरण दिसून आली. या किंमती अजून घसरण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम दिसून येणार आहे. अमेरिकेत महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. 25 बेसिस पॉईंटची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने-चांदी दबावाखाली येण्याची शक्यता आहे. डॉलर (Dollar) अजून मजबूत करण्यासाठी फेडरल रिझर्व्ह कंबर कसणार आहे. त्यामुळे सोने येत्या काही आठवड्यात घसरण्याची शक्यता तज्ज्ञांकडुून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खरेदीदारांना सुवर्णसंधी तर गुंतवणूकदारांची चांदी होणार आहे.
दरवाढीची सलामी
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याने दरवाढीची सलामी ठोकली. 6 जुलै रोजी सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली. तर 4 जुलै रोजी भाव 100 रुपयांनी वधारले होते. 1 जुलै रोजी सोन्याने 220 रुपयांची उसळी घेतली होती. 3 जून रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात अजून किंमती अपडेट झाल्या नाहीत. गुडरिटर्न्सनुसार, 6 जुलै रोजी 22 कॅरेट सोने 54,400 रुपये तर 24 कॅरेट सोने 59,320 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
6 जुलै रोजी सोन्यात किंचित वाढ दिसून आली. 24 कॅरेट सोने 58,644 रुपये, 23 कॅरेट 58,409 रुपये, 22 कॅरेट सोने 53,718 रुपये, 18 कॅरेट 43983 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34307 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.
चांदी वधारली
या महिन्याच्या सुरुवातीला चांदीने पण दरवाढीची सलामी दिली. 1 जुलै रोजी चांदीच्या किंमतीत प्रति किलो 500 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 5 जुलै रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. तर आज 6 जुलै रोजी किलोमागे चांदीचा भाव 800 रुपयांनी वाढले. एक किलो चांदी 73,000 रुपयांवर पोहचली. गुडरिटर्न्सनुसार हा भाव जाहीर करण्यात आला.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.