China : ड्रॅगनला इतक्या लाख कोटींचा दणका, भारतीय व्यापाऱ्यांच्या एकजुटीने स्वदेशीचा हुंकार..

| Updated on: Oct 23, 2022 | 3:22 PM

China : भारतीय व्यापाऱ्यांनी स्वदेशीचा हुंकार भरल्याने चीनला यंदा भारतीय मार्केट शिरकाव करता आला नाही..या देशाचे इतक्या लाख कोटींचे नुकसान झाले..

China : ड्रॅगनला इतक्या लाख कोटींचा दणका, भारतीय व्यापाऱ्यांच्या एकजुटीने स्वदेशीचा हुंकार..
चीनला धोबीपछाड
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : दिवाळीचा सण (Diwali Festival) आला की, बाजारात ‘मेड इन चायना’ (Made In China) उत्पादने दाखल होतात नी दरवर्षी चीनी उत्पादनावर बहिष्काराचे आवाहन केले जाते. पण यंदा केवळ आवाहन करण्यात आले नाही तर व्यापाऱ्यांनी एकजुटपणा दाखविला. दिल्लीतील सर्वात मोठे व्यापारी संघटन सीटीआईने (CTI) चीनी उत्पादन न खरेदीचा निर्णय जाहीर केला नी अंमलबजावणी केली. त्यामुळे चीनचे लाखो कोटींचे नुकसान झाले आहे.

चीनने गलवान घाटीत कुरापती काढल्याने चीनविरोधात संतापाची लाट होती. या असंतोषाला व्याापाऱ्यांनी वाट मोकळी करुन दिली. दिवाळीत चीनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका चीनला बसला आहे.

CTI ने यंदा चीनच्या झालर, फटाके, मुर्ती आणि दिवे तसेच इतर अनेक उत्पादने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. CTI च्या प्रयोगामुळे नवरात्रीपासून ते दिवाळीच्या सुरुवातीपर्यंत चीनी मालाला पर्याय देण्यात आला.

हे सुद्धा वाचा

स्वदेशी मालाला व्यापाऱ्यांनी पहिली पसंती दिली. चांगल्या दर्जाच्या स्वदेशी वस्तूंना चालना देण्याचा निर्णय पथ्यावर पडला. या दोन-तीन महिन्यात चीनी उत्पादनाऐवजी स्वदेशी उत्पादनांची विक्री 1 लाख कोटी रुपयांवर पोहचली.

गृह सजावटीचे सामान, दिवाळी पुजनाचे सामान, देवी-देवता, रंगीत लायटिंग, देवी लक्ष्मी, श्री गणेशाची मुर्ती, पुजेचे सामान, ॐ, आदींसाठी चीनी उत्पादने न घेता स्थानिक भारतीय उत्पादकांना प्राधान्य देण्यात आले.

ग्राहकांना हे स्थानिक कारागिरांनी तयार केलेले सामान, उत्पादन पसंत पडले. चीनी उत्पादने बाजारातून हद्दपार झाले. घरगुती सजावटीच्या सामानासाठी भारतीय शिल्पकार, कारगिरांना प्राधान्य देण्यात आले.

चीनी मालाची मागणी आपोआप कमी झाली. भारतीय सामान आणि उत्पादनांची मागणी वाढली. त्यामुळे भारतीय बाजारातील पैसा चीनमध्ये न जाता तो देशातच राहिला. त्याचा मोठा फटका चीनी मार्केटला बसला आहे.

व्यापाऱ्यांच्या एकजुटीमुळे चीनी मालाचा उठाव झालाच नाही. चीनला तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका यंदाच्या या दोन ते तीन महिन्यात बसला आहे. त्यामुळे चीनी व्यापाऱ्यांना आणि स्थानिक उद्योगांना जोरदार झटका बसला आहे.