नवी दिल्ली | 12 जानेवारी 2024 : टाटा समूह तुमच्या दैनंदिन थाळीत मीठापासून मसालापर्यंत, तर चहापासून ते कॉपीपर्यंत अनेक गोष्टी घेऊन आले आहेत. तुम्ही किचनमधील वस्तूंवर बारीक नजर टाकली तर टाटाचे कोणते उत्पादनं तुमच्या घरात आणली जात आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल.नाष्ट्यात रेडी टू कुक अशा रेसिपीज् आणि डाळी सुद्धा टाटाच्या फूड फॅमिलीत जोडल्या गेल्या आहेत. मसाल्याच्या रुपाने टाटाने आपल्या जेवणाची लज्जत वाढवली आहे. आता टाटा यामध्ये चायनीजचा तडका लावणार आहे. टाटा बाजारात मॅगी नूडल्सला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. कोणत्या कंपन्या येत आहेत टाटा समूहात?
या दोन फूड कंपन्या पंखाखाली
दोन फूड कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची तयारी टाटा समूहाने केली आहे. यामध्ये एक कंपनी कॅपिटल फूड्स आहे. तर दुसरी कंपनी ऑर्गेनिक इंडिया ही आहे. कॅपिटल फूड्स ‘चिंग्स चायनीज’ आणि ‘स्मिथ अँड जोन्स’ सारख्या ब्रँडची मालक आहे. तर ऑर्गेनिक इंडिया ग्रीन टी सारखे उत्पादने विक्री करते. यामध्ये फॅब इंडियाची पण गुंतवणूक आहे.
इतक्या कोटींची उलाढाल
‘मॅगी’ला देणार टक्कर
कॅपिटल फूड्सच्या अधिग्रहणानंतर टाटा समूहाची इन्स्टंट नूडल्स मार्केटमध्ये ग्रँड एंट्री होईल. ‘स्मिथ अँड जोन्स’ पोर्टफोलिओत सध्या ‘अद्रक-लसून पेस्ट’, ‘केच-अप’ आणि ‘इन्स्टंट नूडल्स’ आहेत. यासोबतच बाजारात टाटा समूहाचा थेट सामना नेस्लेच्या ‘मॅगी’शी होईल. मॅगी सध्या बाजारात दादा आहे. तिचा बाजारातील हिस्सा 60% इतका आहे. तर या सेगमेंटमध्ये येप्पी, टॉप रेमन, वाई-वाई आणि पतंजली हे मोठे खेळाडू आहेत. इन्स्टंट नूडल्सचा बाजार जवळपास 5,000 कोटींचा आहे.