मुंबई : CNG PNG Price Hike इंधनाच्या दरात सातत्याने होणारी वाढ हा सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने मोठी आर्थिक झळ बसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता दुसरीकेड सीएनजी गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे. मुंबईला सीएनजी व पीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. नव्या दरवाढीनुसार सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी तर घरगुती वापराच्या पीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो दीड रुपयांची वाढ झाली आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.
सीएनजीच्या दरामध्ये करण्यात आलेल्या वाढीनंतर मुंबईत सीएनजीची किमंत प्रति किलो 63.50 रुपयांवर पोहोचली आहे. तर पीएनजीची किंमत प्रति युनिट 38 रुपये झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या अकरा महिन्यांमध्ये तब्बल 16 वेळेस गॅसचे दर वाढवण्यात आले आहेत. या गॅस दरवाढीचा फटका आठ लांखापेक्षा अधिक ग्राहकांना बसत आहे.
सीएनजीच्या दरवाढीचा परिणाम हा सीएनजी इंधनावर चालणारी गाडी असणाऱ्या तीन लाख ग्राहकांवर होणार आहे. सीएनजी महागल्याने सार्वजनिक क्षेत्रातील वाहन सेवेच्या दरांमध्ये देखील वाढ होऊ शकते. याचा फटका हा प्रवाशांना बसू शकतो. गेल्या तीन महिन्यांमध्ये चौथ्यांदा सीएनजीचे दर वाढवण्यात आले आहेत. सीएनजीचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र त्यातुलनेत काळी पिवळी आणि ऑटो रिक्षाचे भाडे स्थिर असल्याने त्यांना देखील मोठा तोट सहन करावा लागत आहे. सीएनजीचे वाढते दर पहाता भाड्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी विविध रिक्षा चालक-मालक संघटनांकडून होत आहे. सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी दुसरीकडे मात्र पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.
छोट्या बचत योजनांमधील गुंतवणूक झाली कमी, डिमॅट खात्यांमध्ये दुपटीने वाढ; काय आहेत कारणे?
अर्थव्यवस्थेला अच्छे दिन, चालू आर्थिक वर्षात जीडीपी 9.3 टक्के राहण्याचा अंदाज; ब्लूमबर्गचा अहवाल