गेला आठवडा फक्त आपल्या देशातच नाही तर परदेशातही एका घटनेची जोरदार चर्चा आहे. ही घटना आहे एका झूम कॉलवर 900 लोकांना नोकरीवरुन काढल्याची. झूम कॉलवरुन म्हणजे, एका कंपनीच्या सीईओनं ज्यांना काढून टाकायचं आहे, अशा 900 कर्मचाऱ्यांची ऑनलाईन मिटींग घेतली आणि तिथं त्यातल्या प्रत्येकाला काढून टाकण्याची घोषणा केली. ज्यानं मोठ्या तोऱ्यात भीमदेवी थाटात नोकरीवरुन काढण्याची घोषणा केली त्या सीईओचं नाव आहे विशाल गर्ग. (Vishal Garg) विशाल गर्गनं ज्या निर्दयी पद्धतीनं लोकांच्या नोकरीवर गंडांतर आणलं त्याच्या जगभर प्रतिक्रिया उमटल्या. उद्योगपती हर्ष गोयंका आणि त्यानंतर आनंद महिंद्रा यांनीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर मात्र गर्गच्या नोकरीवर संकटं कोसळलं आणि आता त्यालाही सक्तीच्या सुट्टीवर कंपनीनं पाठवलं आहे.
काय म्हणाले आनंद महिंद्रा?
Better.com चे चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर (CEO) होते विशाल गर्ग. त्यांनी एका कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन घरी पाठवलं. बरं हे कर्मचारी काही कनिष्ठ वगैरे अशा दर्जाचे नव्हते. त्यात विदेशी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. झूम मिटींग बोलावून विशाल गर्गनं कर्मचाऱ्यांची वेगवेगळी कारणे देत हकालपट्टी केली. त्यावर आनंद महिंद्रानं ट्विट करत सवाल उपस्थित केले- महिंद्रा म्हणाले-मी हे जाणून घ्यायला उत्सूक आहे की, एवढी मोठी चूक करुन एखाद्या कंपनीचा सीईओ खरंच वाचू शकतो? हे योग्य आहे का? त्यांना दुसरी संधी दिली पाहिजे? फक्त महिंद्राच नाही उद्योगपती हर्ष गोयंकांनीही विशाल गर्गच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केले होते. त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं- मी मनापासून त्या 900 कर्मचाऱ्यांसोबत आहे, ज्यांना झूम कॉलवर विशाल गर्गनं काढून टाकलंय. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे वन टू वन बेसिसवर करा. प्रत्यक्ष त्या कर्मचाऱ्याला बोलावून. आणि तेही ख्रिसमसच्यापूर्वी नाही. मार्केटमध्ये 750 मिलियन डॉलर टाकल्यानंतर नाही. कार्पोरेटला लोक जे बिन काळजाचं म्हणतात ते यामुळेच.
My heart went out to the 900 employees sacked through Zoom by Vishal Garg. Totally wrong! Do it on a one on one basis. And in person. And not before Christmas and after a $750 mn recent infusion. This is how Corporates get a heartless tag!pic.twitter.com/9aPoFNybKp
— Harsh Goenka (@hvgoenka) December 7, 2021
महिंद्रा म्हणतात तशी दुसरी संधी मिळावी?
विशाल गर्ग यांनी जे केलं ते सीईओ म्हणून लीडर म्हणून चुकीचंच असल्याची भावना कार्पोरेटमध्ये व्यक्त केली जातेय. पण त्याच विशाल गर्गना दुसरी संधी द्यायला हवी का असही महिंद्रांनी विचारलंय. त्यावर मात्र मतभेद दिसून येतायत. काहींचं म्हणनं आहे की, यावर खरी तर चर्चा व्हायला नको की, त्यांना दुसरी संधी मिळायला हवी की नाही, तर त्यांना दुसरी संधी मिळावी इतकी सहानुभूती आहे का ते बघावं. तर एका यूजर्सनं म्हटलंय की, जर त्या सर्व 900 कर्मचाऱ्यांना दुसरी संधी मिळणार असेल तर मग विशाल गर्गला का नको?
गर्गचा माफीनामा
अमेरीकेचं महत्वाचं वर्तमानपत्रं आहे न्यूयॉर्क टाईम्स. त्यातल्या एका बातमीनुसार सीईओ विशाल गर्गनं (CEO Vishal Garg) केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितलीय. त्यांनी असं म्हटलंय की ही एक मोठी चूक आहे. दरम्यान कंपनीच्या बोर्डानं गर्गला तात्काळ सक्तीच्या सुट्टीवर पाठवलंय. म्हणजे हे एका पद्धतीनं नोकरीवरुन काढल्याचंच मानलं जातंय.
काय घडलं होतं नेमकं?
विशाल गर्गची सॉप्ट बँकींग फायनान्स कंपनी आहे बेटर डॉट कॉम. त्यातल्या 900 कर्मचाऱ्यांना एका झूम मिटींगवर बोलवून तीन मिनिटाच्या आत सर्वांना नोकरीवरुन काढून टाकलं. यासाठी कंपनी तोट्यात चालत असल्याचं कारण गर्गने दिलं. ह्या झूम मिटींगचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर जोरदार वाद रंगला.
हे सुद्धा वाचा:
Zodiac | लग्न नकोच! , या 5 राशीच्या व्यक्तींना लग्नाची संकल्पनाच आवडत नाही
पुणेकरांच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर रंगला ‘ओपन स्ट्रीट मॉल’ ; महापौरांनीही केले ट्विट