क्रेडिट कार्डचे फायदे एवढे बिंबवले जातात की, क्रेडिट कार्डचे दुष्परिणाम असू शकतात, हे आपल्या गावी ही नसते. ब-याचदा काही एजंट आपल्याला वारंवार संपर्क साधून दुस-या क्रेडिट कार्डच्या फायदेशीर योजना, त्यावर मिळणारे घसघशीत पाईंट आणि कॅशबॅक ऑफर यांची स्वप्न दाखवतात. वापराशिवाय ही क्रेडिट कार्ड दिवास्वप्न ठरतात. ऑनलाइन शॉपिंग व्हाउचर किंवा चित्रपटाच्या तिकिटाच्या आमिषासाठी बरेच लोक अनेक क्रेडिट कार्ड घेतात. त्यामुळे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणे हा फायदेशीर सौदा आहे का ( multiple credit card advantage ) किंवा तोटा (disadvantage ) असा प्रश्न उपस्थित होतो.
वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर विक्री दरम्यान वेगवेगळ्या क्रेडिट कार्डवर डिस्काउंट किंवा कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या बँकांची अनेक कार्डे असतील तर कुठूनही सवलतीत वस्तू खरेदी करता येई शकते. कधीकधी आर्थिक अडचणींमुळे क्रेडिट कार्डबिल भरणे कठीण झाले तर तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा वापर करू शकता. या सुविधेअंतर्गत तुम्ही दुसऱ्या क्रेडिट कार्डमधून क्रेडिट कार्डबिल भरू शकता. मात्र, त्यासाठी बँका व्याज आकारतात. ही सेवा मोफत उपलब्ध नसते. सवलत मिळते मात्र खिसा अधिक खाली होतो. सर्वसामान्य नोकरदाराला एकाच क्रेडिट कार्डवर 10 लाखांची पतमर्यादा मिळणे अशक्य आहे. बँक त्याला अधिकची पत मर्यादा क्वचितच देते, पण तुम्हाला हवे असेल तर वेगवेगळ्या बँकांकडून १-१ लाख रुपयांची मर्यादा असलेली 10 क्रेडिट कार्ड सहज मिळू शकतात. ज्यांच्याकडे अनेक क्रेडिट कार्ड आहेत. त्याचा वापर ही ते करतात आणि वेळेवर मर्यादा संपण्यापूर्वीच बिल अदा करतात. त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगलाच असतो.
आपल्या खिशात अनेक क्रेडिट कार्ड ठेवणे म्हणजे सर्व कार्डातून खरेदी करणे. म्हणजे तुमच्यावरील कर्जाचा बोजा वाढतच जाऊ शकतो, कारण क्रेडिट कार्डचा खर्चही एक प्रकारचे कर्ज आहे.
तुमच्या क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क आकारले जात असले तरी वार्षिक शुल्काच्या नावाखाली तुम्हाला दरवर्षी मोठी रक्कम जमा करावी लागते, हे तुमचे एक प्रकारचे नुकसान आहे.
अधिक क्रेडिट कार्ड असल्याने तुम्ही ईएमआयच्या चक्रव्युहात अडकू शकतात. खरे तर कोणताही माल खरेदी करताना तुम्हाला असे वाटते की, हा माल खरेदी करण्यासाठी तुम्हाला महिन्याकाठी फक्त काही हजार रुपये द्यावे लागतील. पण छुपे शुल्क, क्रेडिट कार्ड वापरासाठीचे बँक आकारात असलेले शुल्क यांचा एकत्रित विचार केल्यास या शुल्कापोटी विविध क्रेडिट कार्डवर महिन्याला खूप मोठी रक्कम कपात होऊन तुम्हाला आर्थिक मदत होण्यापेक्षा डोक्याला ताप होऊ शकतो. त्यात पुन्हा ईएमआय भरण्यास उशीर झाल्यास लागणारा दंड, त्याचा अधिकचा फटका बसू शकतो.
क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा कर्चाचा डोंगर वाढून, तुम्ही त्या गर्तेत अडकू शकतात. केवळ एका क्रेडिट कार्डपेक्षा २-३ कार्ड ठेवणे चांगले आहे, परंतु त्यापेक्षा जास्त कार्ड ठेवू नका. तसेच वार्षिक शुल्क नसलेले अजीवन विनामूल्य क्रेडिट कार्ड मिळविण्याचा प्रयत्न करा. अनेक मोठ्या बँकाही अशी कार्ड देतात. एकापेक्षा जास्त कार्ड घेताना केवळ फ्री व्हाउचर कडेच पाहू नका, तर त्या अतिरिक्त कार्डचा तुम्हाला दीर्घकाळसाठी काय फायदा होऊ शकतो ते पहा.
इतर बातम्या:
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित कोरोना पॉझिटिव्ह
Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा