नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या सर्व विभागांना एअर इंडियाची थकबाकी त्वरित भरण्याचे निर्देश दिलेत. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिलीय. अलीकडेच भारत सरकारने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमधील आपला हिस्सा टाटा सन्सला विकलाय. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एअर इंडिया पूर्णपणे टाटा सन्सकडे सोपवली जाणार आहे. त्याचवेळी एअर इंडियाने सरकारी विभाग आणि मंत्रालयांना विमान तिकीट खरेदीवर दिली जाणारी क्रेडिट सुविधा बंद केलीय.
एअर इंडियाने 2009 पासून सरकारी विभाग आणि मंत्रालयांसाठी ही सुविधा सुरू केली. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान सरकारी मंत्रालये आणि विभागांचे अधिकारी सरकारी खर्चाने विमानाने प्रवास करू शकतात. विमान प्रवासाच्या तिकिटाचा खर्च सरकार नंतर एअर इंडियाला देत असतात. एअर इंडियाचे अनेक वर्षांपासून भारत सरकारवर कर्ज आहे. आता वित्त सचिवांच्या मंजुरीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात, सरकारी विभाग आणि मंत्रालये एअर इंडियावर प्रवास करण्यासाठी क्रेडिट तिकीट खरेदी करू शकणार नाहीत, असे म्हटले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्यांना विमान प्रवासासाठी तिकीट खरेदी करण्यासाठी रोख पैसे द्यावे लागतील.
25 ऑक्टोबरला एअर इंडियाच्या विक्रीच्या करारावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झाले. एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारने टाटा सन्ससोबत शेअर खरेदी करार केला. यानंतर एअर इंडिया आता टाटा सन्सची झालीय. या करारात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि ग्राऊंड हँडलिंग कंपनी एआयएसएटीएसच्या विक्रीचाही समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सरकारच्या हिस्सा विक्रीचे व्यवस्थापन करणाऱ्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सांगितले. सरकार टाटा सन्सच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी भागीदारी करेल. एअर इंडियाच्या वतीने शेअर खरेदी करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली.
टाटा सन्सच्या युनिट टेल्स प्रायव्हेट लिमिटेडने एअर इंडियासाठी केलेली बोली सरकारने स्वीकारली होती. या बोलीमध्ये 2700 कोटी रुपयांची रोख आणि विमान कंपनीच्या 15,300 कोटी रुपयांच्या कर्जाची जबाबदारी घेण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर 11 ऑक्टोबर 2021 ला टाटा समूहाला एअर इंडिया एअरलाईनमधील सरकारच्या 100% स्टेकच्या विक्रीची पुष्टी करण्यासाठी इरादा पत्र (LoI) जारी करण्यात आले.
संबंधित बातम्या
स्वस्त विदेशी चहामुळे देशी चहाच्या बागायतदारांचा त्रास वाढला
Share Market Updates: शेअर बाजारातील दोन दिवसांच्या वाढीला ब्रेक, सेन्सेक्स 207 अंकांनी घसरला
Credit facility closed by Air India, now officials have to buy air tickets in cash says Finance Ministry