नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून मंदी असलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमध्ये अचानक तेजी आल्याचे पहायला मिळाले, आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल 82.72 डॉलरवर पोहोचल्या आहेत. सर्वसाधारणपणे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये देखील वाढ झाल्याचे पहायला मिळते मात्र भारतातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्या असलेल्या एलओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएलने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असताना देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या दरामध्ये घसरण झाली होती, तेव्हा देखील दरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.97 इतका आहे, तर डिझेलचा दर प्रति लीटर 86.67 रुपये आहे, मुंबईमध्ये पेट्रोल 109 रुपये तर डिझेल प्रति लिटर 94.14 रुपयांनी विकले जात आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव 101.40 आणि डिझेल 91.43 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये तर डिझेल 89.79 रुपये प्रती लिटर आहे.
दरम्यान केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये पंजाबच्या चन्नी सरकारने देखील आपल्या राज्यात पेट्रोलचे, डिझेलचे दर कमी केले. पंजाबमध्ये पेट्रोलचे दर तब्बल 11.27 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.9 रुपयांची कपात केली आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या सर्व राज्यांनी काही प्रमाणात पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
संबंधित बातम्या
निर्मला सितारमण साधणार बँकांच्या प्रमुखांशी संवाद; ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा
भारत येत्या मार्चअखेर 400 अब्ज डॉलरची निर्यात करेल; पियुष गोयल यांचा विश्वास