डेलीहंटची पेरेंट संस्था VerSe Innovation स्टार्टअपने रचला इतिहास, 5 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर विक्रमी 805 दशलक्ष डॉलर्स उभारले

| Updated on: Apr 06, 2022 | 12:36 PM

VerSe Innovation या बातमीदारीतील स्टार्ट अपने इतिहास रचला आहे. कंपनीने आपल्या AI/ML क्षमता बळकट करण्यासाठी आणि लाइव्ह स्ट्रीमिंग आणि वेब 3.0 सारख्या नवीन प्रकल्पांसाठी भला मोठा निधी उभारला आहे. निधीचा हा दारुगोळा कंपनीला शेअर चॅट सारख्या स्थानिक प्रतिस्पर्ध्यांशी आणि इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या जागतिक प्रतिस्पर्ध्यांशी लढण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

डेलीहंटची पेरेंट संस्था VerSe Innovation स्टार्टअपने रचला इतिहास, 5 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर विक्रमी 805 दशलक्ष डॉलर्स उभारले
वर्स इनोव्हेशनची भरारी
Image Credit source: फेसबुक
Follow us on

मुंबई : ‘वर्स इनोव्हेशन’ (VerSe Innovation) या बातमीदारीतील स्टार्ट अपने इतिहास रचला आहे.5 अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन असलेल्या या कंपनीने विक्रमी 805 दशलक्ष डॉलर्स उभारले आहेत. कंपनीने आपल्या AI/ML क्षमता बळकट करण्यासाठी आणि लाइव्ह स्ट्रीमिंग आणि वेब 3.0 सारख्या नवीन प्रकल्पांसाठी भला मोठा निधी उभारला आहे. निधीचा हा दारुगोळा कंपनीला शेअर चॅट सारख्या स्थानिक प्रतिस्पर्ध्यांशी आणि इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या जागतिक प्रतिस्पर्ध्यांशी लढण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. बातमीदारीतील दुवा असणाऱ्या डेलीहंट (Daily Hunt) आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप जोशचे पालकत्व VerSe Innovation कडे आहे. 6 एप्रिल रोजी कंपनीने या यशाबद्दल माहिती दिली. भारतीय स्टार्ट अप (Start Up)सध्या जगात नाव कमावत आहे. सरकारने ही स्टार्ट अप ला पाठबळ दिले आहे. नव्या दमाच्या उद्योगांच्या क्रमवारीत जागतिक पातळीवर भारताने पण झेप घेतली आहे. 2007 मध्ये वीरेंद्र गुप्ता आणि शैलेंद्र शर्मा यांनी व्हर्से इनोव्हेशनची स्थापना केली होती.

सर्वात मोठा विक्रमी निधी

या वर्षात भारतीय स्टार्टअपने उभारलेला हा सर्वात मोठा निधी आहे. सध्याची भूराजकीय परिस्थिती पाहता आणि विशेषत: अशा वेळी जेव्हा गुंतवणूकदार गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगत आहेत अशावेळी डेलीहंटच्या प्रायोजकांनी मिळविलेले हे सर्वात मोठे यश आहे. आतापर्यंतचे 805 दशलक्ष डॉलर्स निधी उभारुन ते यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यानंतर स्विगीने 700 दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. 400 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्या खेळाडूत पॉलिगॉन, बायजू आणि युनिफोर यांचा समावेश आहे.

कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPP Investment ) यांनी या गुंतवणुकीत आघाडी घेतली आहे. आणि 425 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती. इतर गुंतवणूकदारांमध्ये ओंटारियो टीचर्स पेन्शन प्लॅन बोर्ड (Ontario Teachers’), लक्सर कॅपिटल आणि सुमेरू वेंचर्स यांचा समावेश आहे.

आतापर्यंत कंपनीने 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी जमा केला आहे, ज्यापैकी 1.5 अब्ज डॉलर्स गेल्या वर्षभरातच जमा झाले आहेत.

2007 मध्ये वीरेंद्र गुप्ता आणि शैलेंद्र शर्मा यांनी व्हर्से इनोव्हेशनची स्थापना केली होती. उमंग बेदी फेब्रुवारी 2018 मध्ये या कंपनीत रुजू झाले. टिकटॉक बंदीनंतर लगेचच कंपनीने 2020 मध्ये शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म जोश लाँच केला आणि त्यावर कंटेट क्रिएटर्सच्या उड्या पडल्या आहेत.

डेलीहंट, ज्याचे 350 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत, जोश, त्याचे शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म, 150 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते (MAUs) आहेत आणि फर्म या महिन्यापासून प्लॅटफॉर्मचे मुद्रीकरण करण्याचा विचार करेल. पब्लिकव्हायब, एक हायपरलोकल व्हिडिओ प्लॅटफॉर्म, पाच दशलक्षाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.

लाइव कॉमर्स, वेब3

कंपनी येत्या काही आठवड्यांत थेट व्यावसायिक लाईव्ह प्लॅटफॉर्म या आठवड्यात सुरू करत आहे. Flipkart शी भागीदारी करत ShareChat’s Moj यांनी व्यावसायिक लाईव्ह प्लॅटफॉर्म गेल्या ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू केले आहे. त्याला डेलीहंट चा व्यावसायिक लाईव्ह प्लॅटफॉर्मला टफ फाईट दिली आहे.

अलीकडेच जिओकडून 200 दशलक्ष डॉलर्सचा निधी प्राप्त झालेल्या InMobi’s Glance, त्याच्या शॉर्ट व्हिडिओ अॅप Roposoद्वारे थेट व्यावसायिक स्पर्धेत मोठी झेप घेतली आहे. जिओमार्ट चालवणार् या रिलायन्स रिटेलच्या पाठिंब्यामुळे, Roposo च्या थेट व्यावसायिक हालचालींना लक्षणीय चालना मिळाली आहे.

इतर बातम्या :

नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न, राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

भुजबळांचा गिरणा गौरव पुरस्काराने सन्मान; साहित्य संमेलनच्या यशस्वी आयोजनाबद्दल नाशिकमध्ये कोडकौतुक

संजय राऊतांनी हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, नागपुरात वरुण सरदेसाई यांचे वक्तव्य