मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीतून सावरल्यानंतर भारतात मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे दिवस परत येतील. पुढील वर्षापासून लोकांना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळू लागतील, अशी अपेक्षा आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की, 2021 च्या दरम्यान भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 8 टक्के वाढ होईल. कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे आणि त्यांना कायम ठेवणे हे कंपन्यांसमोरचे आव्हान आहे, असे जागतिक सल्लागार, ब्रोकिंग आणि सोल्युशन्स कंपनी विलिस टॉवर्स वॉटसनच्या ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग रिपोर्ट’ मध्ये म्हटले. अशा स्थितीत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पगारवाढ देतील.
अहवालात म्हटले आहे की, भारताला पुढील वर्षी आशिया-पॅसिफिकमध्ये सर्वाधिक वेतनवाढ दिसेल. या दरम्यान येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 9.3 टक्के वाढ अपेक्षित आहे. यासह अहवालात असे म्हटले आहे की, पुढील 12 महिन्यांत व्यवसाय दृष्टिकोनात सुधारणा पाहणे सोपे आहे. हे अर्धवार्षिक सर्वेक्षण मे आणि जून 2021 दरम्यान आशिया-पॅसिफिकच्या विविध उद्योग क्षेत्रातील 1,405 कंपन्यांमध्ये करण्यात आले, यापैकी 435 कंपन्या भारतातील आहेत.
वेतन बजेट योजनेच्या अहवालानुसार, 52 टक्के भारतीय कंपन्यांचा असा विश्वास आहे की, पुढील 12 महिन्यांत त्यांचा महसूल दृष्टिकोन सकारात्मक असेल. वर्ष 2020 च्या चौथ्या तिमाहीत असे मानणाऱ्या कंपन्यांची संख्या 37 टक्के होती. व्यवसायाच्या स्थितीत सुधारणा झाल्यामुळे नोकऱ्यांची परिस्थितीही सुधारेल. अहवालात असे म्हटले आहे की, 30 टक्के कंपन्या पुढील एका वर्षात नवीन नियुक्त्यांच्या तयारीत आहेत. 2020 च्या तुलनेत हे जवळपास तिप्पट आहे.
अभियांत्रिकी क्षेत्र 57.5 टक्के, माहिती तंत्रज्ञान 53.3 टक्के, तांत्रिक कौशल्य 34.2 टक्के, विक्री क्षेत्र 37 टक्के आणि वित्त क्षेत्र 11.6 टक्के कंपन्यांना जास्तीत जास्त नवीन भरती दिसेल. या सर्व क्षेत्रात कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना जास्त पगार देतील. त्याचबरोबर जुन्या कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, भारतात नोकरी कमी होण्याचे प्रमाण आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील उर्वरित देशांच्या तुलनेत कमी आहे.
संबंधित बातम्या
देशातील सरकारी आणि खासगी रिफायनरी कंपन्यांचा समूह सरकार तयार करणार, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार