डिजिटल पेमेंट होणार आणखी सुलभ, आता कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही, NPCI चा येस बँकेशी करार

| Updated on: Oct 01, 2021 | 8:07 AM

NPCI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, RuPay कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्युशनमुळे ग्राहकांना दररोज वियरेबल अॅक्सेसरीजसह लहान आणि मोठ्या मूल्याचे व्यवहार करता येतील. याचा अर्थ असा की, कार्ड वेअर करण्यायोग्य पेमेंट सोल्यूशन म्हणून काम करते, जे कॉन्टॅक्टलेस पेमेंट स्पेस बदलण्याची शक्यता आहे.

डिजिटल पेमेंट होणार आणखी सुलभ, आता कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही, NPCI चा येस बँकेशी करार
Follow us on

नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) झपाट्याने विस्तार होत आहे. त्याच वेळी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ‘RuPay On-the-Go’ कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्यूशन लॉन्च करण्यासाठी खासगी क्षेत्रातील येस बँकेशी करार केला. ग्राहकांसाठी ही पहिलीच सुविधा आहे.

फिजिकल कार्ड बाळगण्याची गरज दूर होणार

NPCI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, RuPay कॉन्टॅक्टलेस पेमेंट सोल्युशनमुळे ग्राहकांना दररोज वियरेबल अॅक्सेसरीजसह लहान आणि मोठ्या मूल्याचे व्यवहार करता येतील. याचा अर्थ असा की, कार्ड वेअर करण्यायोग्य पेमेंट सोल्यूशन म्हणून काम करते, जे कॉन्टॅक्टलेस पेमेंट स्पेस बदलण्याची शक्यता आहे. यामुळे फिजिकल कार्ड बाळगण्याची गरज दूर होईल. यामध्ये ग्राहकांना ‘टॅप आणि पे’ ची सुविधा मिळते.

‘रुपे ऑन द गो’ ची वैशिष्ट्ये-

>> रुपे-ऑन-द-गो इंटरऑपरेबल, ओपन-लूप सोल्यूशन ही ग्राहकांसाठी एक जलद आणि सुरक्षित सेवा आहे. हे स्मार्ट आणि उत्तम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.
>> ग्राहक रुपे कॉन्टॅक्टलेस-सक्षम पॉइंट ऑफ सेल (PoS) किरकोळ दुकानांवर सेवा वापरू शकतात आणि पिन प्रविष्ट न करता 5000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात. ग्राहकांना 5000 रुपयांच्या वर पेमेंट करण्यासाठी पिन टाकावा लागेल.
>> याशिवाय भीम ऑनलाईन व्यवहारांसाठी येस पे अॅपच्या ग्राहकांना व्हर्च्युअल रूपे कार्ड प्रदान करते. हे डिजिटल आणि ई-कॉमर्स व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते.

7.75% व्याजदर, शून्य प्रक्रिया शुल्क, घरी बसून असा करा अर्ज

SBI Car Loan: जर तुम्ही येत्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण तुमचे बजेट कमी आहे. तर तुम्ही वाहन कर्जाची मदत घेऊ शकता. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्वात कमी व्याजदराने वाहन कर्ज देत आहे. यासह आपण घरी बसून कार कर्जासाठी ऑनलाईन अर्जदेखील करू शकता. बँक ग्राहकांसाठी अनुकूल वाहन कर्ज देखील देते, जसे नियमित कार कर्ज, प्रमाणित पूर्व मालकीचे कर्ज, विद्यमान गृहकर्ज धारकांसाठी एसबीआय लॉयल्टी कार कर्ज, विद्यमान मुदत ठेव ग्राहकांसाठी आश्वासित कार कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक कारसाठी ग्रीन कार कर्ज उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

‘या’ खासगी बँकेत व्हिडीओ KYC अपडेट करणे सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SBI Car Loan: 7.75% व्याजदर, शून्य प्रक्रिया शुल्क, घरी बसून असा करा अर्ज