WITT 2024 : दूध असो की सौंदर्य प्रसाधने… भारताची ओळख अशी बदलतेय..

| Updated on: Feb 26, 2024 | 3:29 PM

व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचा आज दुसरा दिवस आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये अनेक मान्यवर हे सहभागी होताना दिसत आहेत. हेच नाही तर जाहिरपणे मंचावर मान्यवर आपली मते मांडताना देखील दिसत आहेत. आता नुकताच स्टार्टअपबद्दल मोठे भाष्य करण्यात आले आहे.

WITT 2024 : दूध असो की सौंदर्य प्रसाधने... भारताची ओळख अशी बदलतेय..
Follow us on

मुंबई : देशाचे नंबर 1 असलेले न्यूज नेटवर्क अर्थात TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचा आज दुसरा दिवस आहे. आज दिवसभरात अनेक नामवंत नावे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये सहभागी होणार आहेत. उद्योजक, राजकारणी आणि विविध क्षेत्रातील नामवंत लोक आपली मते मांडताना दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची जोरदार तयारी देखील सुरू आहे. हे दुसरे पर्व आहे. बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन देखील या सत्रात सहभागी झाली. यावेळी रवीना थेट नेपोटिझमवर बोलताना दिसली.

व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी सत्रात अमूलचे जयन मेहता, ममार्थचे गजल अलग, 108 कॅपिटलच्या सुषमा कौशिक, नोब्रोकरचे सीटीओ अखिल गुप्ता सहभागी झाले. यावेळी अमूलचे एमडी जयन मेहता यांनी सत्रात काही मोठे खुलासे देखील केले आहेत. ते म्हणाले की, आता लोणी असो किंवा दूध आता ते लोकांना अत्यंत सहजपणे मिळते.

अमूलचे एमडी जयन मेहता म्हणाले, 1946 मध्ये सुरू केलेला अगदी छोटा व्यवसाय आता देशातील नंबर 1 चा ब्रँड बनले आहे. विशेष म्हणजे भारतीय दूध केवळ भारतामध्येच नाही तर विदेशात देखील ठसा उमटवत आहे. हेच नाही तर जयन मेहता यांनी सांगितले की, भारतीय दुधाचे सर्वात जास्त मोठे खरेदी करणारे हे विदेशी लोकच आहेत. जगातील 1/4 दूध फक्त भारतातून येते.

या सत्रामध्ये रिअल इस्टेट ॲप नोब्रोकरचे सहसंस्थापक अखिल गुप्ता यांनीही मोठे विधान केले. अखिल गुप्ता हे म्हणाले की, नोब्रोकर ॲप आणि वेबसाइट सुरू झाल्यापासून लोकांचा रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहारांवर मोठा विश्वास हा नक्कीच बसला आहे. फ्लॅट ऑनलाइन शोधणे असू किंवा विकणे आणि खरेदी करणे असो, हे आता नोब्रोकर ॲपमुळे खूप जास्त सहज होणारे काम झाले.

मामाअर्थच्या सहसंस्थापक आणि शार्क इंडियाच्या गजल अलघ यांनीही मोठे भाष्य केले. गजल अलघ म्हणाल्या की, मामाअर्थ लाँच करणे खूप जास्त गरजेचे गोते. मामाअर्थला यशस्वी ब्रँड म्हणून स्थापित करण्यापूर्वी गजल अलघ यांनी अनेक स्टार्टअप्स देखील सुरू केले. यावेळी बोलताना 108 कॅपिटलच्या सुषमा कौशिक म्हणाल्या की, प्रत्येक गुंतवणूकदाराच्या 3 गरजा असाव्यात. ट्रिपल पी म्हणजे सार्वजनिक, भागीदारी, खाजगी मॉडेल असणे आवश्यक आहे.