सरकारी कंपन्या आणि बँकांमुळे केंद्र सरकार मालामाल झाले आहे. या संस्थांनी हजारो कोटी रुपयांचा लाभांश (डिव्हीडंट) सरकारला मिळवून दिला आहे. सर्वात मोठी बँक असलेल्या एकट्या भारतीय स्टेट बँकेने सरकारला 6959.29 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लाभांशाचा चेक सुपूर्द केला. बँक ऑफ महाराष्ट्रनेही सरकारला 857 कोटी रुपयांचा लाभांश दिला. अर्थमंत्रालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लाभांशाचे धनादेश विविध बँका आणि कंपन्यांकडून देण्यात आले.
लाभांश हा कंपनीच्या नफ्याचा एक भाग आहे. जो भागधारकांना दिला जातो. लांभाश हा रोख, रोख समतुल्य, शेअर्स इत्यादी स्वरूपात असू शकते. सरकारी कंपन्या किंवा सरकारी बँका लाभांश वितरीत करतात, तेव्हा कंपनीमध्ये केंद्र सरकारची हिस्सेदारी असते. त्यामुळे त्या लाभांशाचा पैसा सरकारच्या तिजोरीत पोहोचतो.
Raksha Mantri Shri @rajnathsingh received an interim dividend cheque of Rs 121.53 crore for Financial Year 2022-23 from Chairman and MD, Bharat Dynamics Limited Commodore A Madhavarao (Retd) in New Delhi today. pic.twitter.com/dcn5Nhu8xd
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) July 30, 2024
भारत डायनॅमिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना 121 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. भारत डायनॅमिक्स लिमिटेडनेही सरकारला लाभांश म्हणून एवढ्या मोठ्या रकमेचा धनादेश दिला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी, कमोडोर ए माधवराव (निवृत्त) यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 121.53 कोटी रुपयांचा धनादेश देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सुपूर्द केला. संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनीचे मुख्यालय हैदराबादमध्ये आहे. भारत डायनॅमिक्स कंपनीने मे महिन्यात कंपनीच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानुसार कंपनीचा नेट प्रॉफिट 89.04 टक्के वाढला होता.