महागाई वाढत असताना लोकं घर घेण्यासाठी, लग्नासाठ किंवा इतर वस्तू घेण्यासाठी देखील कर्ज घेतात. पण अनेक वेळा विचार न करता घेतलेले कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा वापर तुम्हाला अडचणीत आणू शकतो. आम्ही तुम्हाला आज अशाच काही टिप्स सांगणार आहोत, जे तुम्हाला कर्जाच्या भोवऱ्यातून बाहेर काढण्यात मदत करू शकतात. तुम्ही कर्ज घेता तेव्हा बँक किंवा एजंट तुम्हाला अनेक प्रकारच्या योजना सांगतात. ज्यामध्ये तुम्हाला जास्त कर्ज घेतले तर व्याजदर कमी मिळेल. जास्त कालावधीसाठी कर्ज घेतले तर व्याज कमी असेल. अशा अनेक गोष्टी सांगत असतात. परंतु तुम्हाला आवश्यक तेवढेच कर्ज घेतले पाहिजे. जर तुम्ही आधीच कर्जाचा EMI भरत असाल तर दुसरे कर्ज घेणे टाळले पाहिजे.
जर तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर सर्वप्रथम तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज आणि बचत निश्चित केली पाहिजे. तुम्हाला खर्चाची मर्यादा निश्चित करावी लागेल आणि पैसे खर्च करताना योजना तयार करावी लागेल. ही यादी तयार करताना कोणत्या कर्जावर किती व्याज आकारले जात आहे हे देखील टाकावे. उदाहरणार्थ, गृह कर्ज हे वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डपेक्षा कमी व्याज आकारते. त्यामुळे लवकरात लवकर वाढीव व्याजासह कर्जाची पुर्तता करण्यावर प्रथम लक्ष केंद्रित केले पाहिजे.
ईएमआयचे ओझे टाळण्यासाठी तुम्ही प्री-पेमेंटचा पर्यायही निवडू शकता. तुमची बचत वाढवून तुम्ही वार्षिक 10 टक्क्यांनी EMI वाढवू शकता. याद्वारे तुम्ही ६५ टक्के व्याज वाचवू शकता.
ईएमआयचा बोजा कमी करण्यासाठी तुम्ही री-फायनान्सची पद्धत देखील अवलंबू शकता. या अंतर्गत तुम्ही महागड्या कर्जांना स्वस्त दरात रूपांतरित करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड कर्ज घेतले असेल, तर तुम्ही गृहकर्ज घेऊन ते कर्ज रद्द करू शकता. कारण गृहकर्जावरील व्याजदर कमी आहेत.