बड्या कंपनीच्या सीईओपेक्षा डोसेवाल्याची कमाई अधिक, आकडा ऐकून आश्चर्यचकित व्हाल; पोस्ट व्हायरल

| Updated on: Dec 06, 2024 | 6:31 PM

सोशल मीडियावर एका डोसा विक्रेत्याच्या दिवसाला 20,000 रुपये कमाईचा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाली आहे. यामुळे कर आणि उत्पन्नातील असमानतेवर चर्चा रंगली आहे. काहीजण या दाव्याला दुजोरा देताना दिसत आहेत तर काहीजण त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या वादात डोसा विक्रेत्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत नोकरी करणाऱ्यांच्या करभरपाईचा मुद्दाही समोर आला आहे.

बड्या कंपनीच्या सीईओपेक्षा डोसेवाल्याची कमाई अधिक, आकडा ऐकून आश्चर्यचकित व्हाल; पोस्ट व्हायरल
Follow us on

सोशल मीडियावर अनेकदा असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पोस्टही व्हायरल होतात. नोकरी सोडून बिझनेस सुरू करणारे लोकही अशा पोस्ट किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. काही कार्पोरेट नोकऱ्या करणारे लोकही आपलं स्वत:चं काही तरी करण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात काही यूजर्सने दावा केलाय की, एक डोसा विक्रेता दिवसाला 20 हजार रुपये कमावतो. म्हणजे तो महिन्याला सहा लाख रुपये पगार कमावतो. एखाद्या कंपनीच्या सीईलाही एवढा पगार नसेल तेवढा पगार हा डोसा विक्रेता कमावतो. कोण आहे तो? काय आहे त्याचं गणित तेच जाणून घेऊया.

पोस्ट काय आहे?

सर्व सोशल मीडियातील गुंतवणूक हटवली तरी डोसा विक्रेत्याचे दर महिन्याचे 3 ते 3.5 लाख रुपयांची बचत होते. ही पोस्ट आल्यानंतर कर आणि उत्पन्नाच्या असमानतेबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ही पोस्ट गेल्या काही काळापासून व्हायरल होत आहे. या पोस्टमधून कार्पोरेट, नोकरदार आणि व्यापारी वर्गाची बाजू घेण्यात आली आहे. दुसरा गट डोसावाल्याची बाजू घेताना दिसत आहे.

कोप्पराम नावाच्या यूजर्सने ट्विटरवर पोस्ट केली आहे. तो म्हणतो, माझ्या घराच्यासमोर एक स्ट्रीट फूड डोसा विक्रेता आहे. तो दिवसाला सरासरी 20 हजार रुपये कमावतो. म्हणजे त्याला महिन्याला 6 लाख रुपये मिळतात. त्याचे सर्व खर्च वजा केले तरी त्याला महिन्याला 3 ते 3.5 लाखाचा नफा होतो. आणि तो एक रुपया आयकर सुद्धा भरत नाही. तर महिन्याला 60,000 रुपये कमावणाऱ्याला मात्र त्याच्या उत्पन्नातील 10 टक्के भरपाई करावी लागते.

कमेंट्स काय?

या पोस्टवर कमेंट्स आल्या आहेत. एका व्यक्तीला महिन्याला 60 हजार रुपये कमावल्यानंतर दहा टक्के कर भरावा लागतो, असा मुद्दा आल्यानंतर त्यावर कमेंट्स आल्या आहेत. त्यावर एकाने सेल्समन बाबत असं काही घडत नसल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्याने तर डोसावाल्याचं काय घेऊन बसला, वकील, डॉक्टर, चहाचं दुकान चालवणारे, गॅरेज चालवणारे आणि व्यापाऱ्यांच्याबाबत काय सांगाल? असा सवाल केला आहे. यातील अनेक लोक विदेशात सुट्टी घालवण्यासाठी जात असतात. आपलं घर बदलतात. नवीन वाहने घेतात. तेही काही आयकर भरत नाहीत. त्यांचं काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

एक जण म्हणाला की, डोसावाल्याला कार्पोरेट बीमा मिळत नाही. कार, घर, कर्ज आणि बाईक आदी गोष्टींसाठी त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांचा पीएफ कापला जात नाही. कोणतंही निश्चित उत्पन्न नाही. कदाचित 60 हजार रुपये कमावणारा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर आयकरापेक्षा अधिक जीएसटी भरत असेल.