Kalyan Jewellers IPO : 18 मार्चपर्यंत पैसे कमावण्याची मोठी संधी, 86 रुपये गुंतवा आणि बक्कळ कमवा

| Updated on: Mar 16, 2021 | 1:07 PM

कोरोनाच्या भीषण काळानंतर आता मार्केटमध्ये पैसे कमावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. अशात कल्याण ज्वेलर्सही आपला आयपीओ घेऊन आला आहे.

Kalyan Jewellers IPO : 18 मार्चपर्यंत पैसे कमावण्याची मोठी संधी, 86 रुपये गुंतवा आणि बक्कळ कमवा
Follow us on

मुंबई : शेअर मार्केटमध्ये बक्कळ पैसा कमावण्याची उत्तम संधी चालून आली आहे. कारण आता आणखी एक आयपीओ उघडणार आहे. कोरोनाच्या भीषण काळानंतर आता मार्केटमध्ये पैसे कमावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. अशात कल्याण ज्वेलर्सही आपला आयपीओ घेऊन आला आहे. ज्वेलरी कंपनी कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) आज म्हणजेच 16 मार्च रोजी आपला आयपीओ आणत आहे, जो 18 मार्चला बंद होणार आहे. या आयपीओद्वारे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात. (earn money kalyan jewellers ipo opens from today investors can get earn good money)

1175 कोटी उभारण्याची योजना

कल्याण ज्वेलर्सने आयपीओसाठी किंमत बँड निश्चित केला आहे. कंपनीने त्याची किंमत प्रति शेअर 86-87 रुपये ठेवली आहे. कल्याण ज्वेलर्सचा हा आयपीओ आज उघडत आहे म्हणजेच 16 मार्चपासून ते 18 मार्चला बंद असेल. या आयपीओद्वारे सुमारे 1175 कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. यापूर्वी कंपनीने या आयपीओद्वारे 1750 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली होती. पण सध्याची बाजारपेठेची परिस्थिती पाहता कंपनीने हे 1175 कोटी केले आहे.

कंपनीविषयी महत्त्वाची माहिती…

कल्याण ज्वेलर्स ही कंपनी दागिन्यांच्या व्यवसायात आहे. कल्याण ज्वेलर्सचे देशातील 21 राज्यात 107 शोरूम आहेत. याशिवाय या कंपनीचे विदेशातही 30 शोरूम आहेत. आता कंपनी आयपीओद्वारे शेअर बाजाराची यादी करुन गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करून आपला व्यवसाय वाढवण्याच्या विचारात आहे. तुम्हीदेखील कंपनीचा आयपीओ खरेदी केल्यास चांगले पैसे कमावू शकता.

कशी कराल गुंतवणूक ?

बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते बँक खात्यासारखेच आहे, फरक फक्त इतका आहे की बँक खात्यात पैसे व्यवहार केले जातात. तर डिमॅट खात्यात शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. ज्याप्रमाणे बँकांमध्ये पैसे सुरक्षित असतात तसेच डिमॅट खात्यातील शेअर्स सुरक्षित असतात. तुम्हालाही या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे डिमॅट खाते असलेच पाहिजे. (earn money kalyan jewellers ipo opens from today investors can get earn good money)

संबंधित बातम्या – 

गुंतवणुकीचा उत्तम पर्याय, 6 महिन्यांत 30 तर वर्षात 50 टक्के मिळेल परतावा, लवकर होईल पैसा डबल

तुमच्याकडे बाईक किंवा कार असेल तर आधी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान

‘या’ बँकेमध्ये खातं असल्यास बसेल आर्थिक फटका, 1 एप्रिलपासून प्रत्येक व्यवहारासाठी द्यावे लागणार पैसे

(earn money kalyan jewellers ipo opens from today investors can get earn good money)