नवी दिल्लीः जर तुम्ही काम करता आणि EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. खरं तर कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांना पीएफ आणि पेन्शन व्यतिरिक्त जीवन विम्याचे मोठे फायदे दिलेत. या अंतर्गत सदस्यांना 7 लाख रुपयांचे विनामूल्य जीवन विमा संरक्षण मिळतेय, यासाठी ग्राहकांना कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. परंतु या 7 लाख रुपयांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी एक फॉर्म भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुमच्या कुटुंबाला त्याचा लाभ घेता येणार नाही.
यासंदर्भात सेवानिवृत्ती निधी संस्थेने अलीकडेच अधिसूचना जारी केलीय. प्रत्येकाने आपले ई-नामांकन दाखल करावे, जेणेकरून खातेदारांच्या कुटुंबाची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित होईल. EPFO ही देशाची प्रमुख संस्था आहे, जी EPF आणि MP अधिनियम 1952 च्या कायद्यानुसार संघटित/अर्ध-संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करते.
Members should file e-Nomination today to provide #SocialSecurity to their families. Follow these easy steps to file EPF/EPS nomination #digitally. #PF #ईपीएफ@byadavbjp @Rameswar_Teli @PMOIndia @PIB_India @PIBHindi @MIB_India @mygovindia @DDNewslive @airnewsalerts @PTI_News pic.twitter.com/rcoTgfAftB
— EPFO (@socialepfo) August 17, 2021
? ईपीएफचे सर्व सदस्य कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना, 1976 (EDLI) अंतर्गत येतात. EDLI योजनेंतर्गत प्रत्येक EPF खात्यावर 7 लाख रुपयांपर्यंतचे विनामूल्य विमा संरक्षण उपलब्ध आहे.
? सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते. नियोक्ता देखील 12 टक्के जमा करतो, परंतु तो दोन भागांमध्ये जमा केला जातो. कंपनी ईपीएफमध्ये 3.67 टक्के आणि ईपीएसमध्ये 8.33 टक्के रक्कम जमा करते. पीपीएफ ग्राहकांच्या नामांकित व्यक्तीला EDLI मध्ये कंपनीने जमा केलेल्या 0.5 टक्के योगदानानुसार 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.
ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्ती जीवन विम्याच्या रकमेवर दावा करू शकतो. पीएफ खातेधारकांसाठी उपलब्ध असलेला हा विमा केवळ नोकरीदरम्यानच दावा करता येतो. निवृत्तीनंतर हा लाभ मिळत नाही.
>> सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाईट https://www.epfindia.gov.in/ वर जा.
>> ‘Services’ पर्यायावर क्लिक करा आणि त्याखाली ‘For Employees’ पर्यायावर क्लिक करा.
>> तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, त्यानंतर ‘Member UAN/Online Service’ पर्यायावर क्लिक करा.
>> मॅनेज टॅब अंतर्गत ई-नामांकन निवडा. असे केल्याने प्रोव्हाइड डिटेल्स टॅब स्क्रीनवर दिसेल, त्यानंतर Save वर क्लिक करा.
>> आता कुटुंब डिक्लेरेशनसाठी होय वर क्लिक करा, नंतर कुटुंब तपशील जोडा आणि क्लिक करा.
>> येथे एकूण रकमेच्या शेअरसाठी नामांकन तपशीलांवर क्लिक करा, नंतर Save EPF Nomination वर क्लिक करा.
>> ओटीपी जनरेट करण्यासाठी ई-चिन्हावर क्लिक करा, आता आधारशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी टाका.
>> तुम्ही हे करताच तुमचे ई-नामांकन EPFO मध्ये नोंदणीकृत होते.
संबंधित बातम्या
तुम्ही कर्जाची परतफेड केलीय, मग हा कागद बँकेतून नक्की घ्या, अन्यथा…
बँक खात्यातून 177 रुपये कापले जातायत? जाणून घ्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे का वसूल करतात?
If you are working, fill up this form early, otherwise you will lose Rs 7 lakh