नवी दिल्ली : आधी कोरोनाचा फटका बसलेल्या देशातील पोल्ट्री व्यवसायाने आत्ता कुठे पुन्हा एकदा सामान्य स्थितीत येण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यातच आता या व्यवसायासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. ऐन थंडीतही अंडी आणि चिकनच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे अंडे आणि चिकनच्या किमतीही कमी झाल्यात. यामागील कारण आहे देशातील बर्ड फ्लू रोगाच्या भीतीचं सावट. देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या घटना समोर येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून देशातील अंडी आणि चिकनच्या मागणीत मोठी घट झालीय (Egg and Chicken demand and price decreasing due to bird flu).
बर्ड फ्लूच्या भीतीने देशातील चिकन आणि अंड्याची मागणी जवळपास 60 टक्क्यांनी कमी झालीय. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे दरही कोसळले आहेत. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या काळात पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर देखील कोसळत आहेत.
पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश खत्री म्हणाले, “मागील दोन दिवसांमध्ये पोल्ट्री उत्पादन असलेल्या चिकन आणि अंड्यांच्या मागणीत 60 टक्के घट झालीय. त्यामुळेच त्याच्या किमतीवरही परिणाम झालाय. मागील आठवड्यात एका पक्षाची म्हणजेच कोंबड्याची किंमत 100 रुपये किलो होती, तिथं आता घट होऊन 60 रुपये प्रति किलो दर झालेत.
सध्या बर्ड फ्लूच्या केसेस मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये आठळल्या आहेत. असं असलं तरी कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आलेली नाहीत. त्यानंतरही चिकन आणि अंडे विक्रीवर याचा मोठा परिणाम झालाय. बिहारचे पोल्ट्री फार्म संचालक दुध किशोर सिंह म्हणाले, “3 दिवसांपूर्वी अंड्याचे दर शेकडा 570 ते 585 रुपये इतके होते. आता या दरात घट होऊन बुधवार (7 जानेवारी) 535 रुपये शेकडा झालेत. सध्या अंडी आणि चिकनची विक्री ठप्प होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
ठाण्यात 14 बगळे मृतावस्थेत सापडले, बर्ड फ्लूच्या भीतीने मुंबईकरांचीही धाकधूक वाढली
Bird Flu Alert | ‘बर्ड फ्लू’पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा!
देशातील 4 राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा कहर, उस्मानाबादेतील पोल्ट्री व्यावसायिक सावध, घेतली जातीय अशी काळजी
Egg and Chicken demand and price decreasing due to bird flu