ईदची सुट्टी रद्द, 31 मार्चला बँका सुरू; RBI चा मोठा निर्णय, 1 एप्रिल रोजी असेल सुट्टी, कारण तरी काय?

| Updated on: Feb 14, 2025 | 9:19 AM

Eid Holiday RBI : यावेळी 31 मार्च रोजी बँकांना सुट्टी नसेल. या दिवशी ईदची सुट्टी बँक कर्मचाऱ्यांना मिळते. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्च 2025 ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

ईदची सुट्टी रद्द, 31 मार्चला बँका सुरू; RBI चा मोठा निर्णय, 1 एप्रिल रोजी असेल सुट्टी, कारण तरी काय?
ईदची सुट्टी रद्द
Follow us on

यावेळी 31 मार्च रोजी बँकांना सुट्टी नसेल. या दिवशी ईदची सुट्टी बँक कर्मचाऱ्यांना मिळते. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्च 2025 ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.  31 मार्च 2025 रोजी संपणाऱ्या 2024-25 या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

या शहरात नाही सुट्टी

RBI प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करते. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश आहे. अर्थात सर्वच राज्यात एकाच दिवशी सुट्टी नसेल. काही राज्यात एकाच दिवशी बँका बंद असतील. तरीही कामांचा खोळंबा टाळण्यासाठी सुट्यांच्या यादी ग्राहकांनी तपासणे फायद्याचे ठरते.

हे सुद्धा वाचा

31 मार्च 2025 रोजी संपणाऱ्या 2024-25 या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. याप्रमाणे मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी आदी शहरांत 31 मार्च रोजी बँकांना सुट्टी नसेल.

1 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी

1 एप्रिल (मंगळवार) रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बुहतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये 31 मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता.

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.