Share Market : खरच असं घडलं, एकादिवसात 3.50 रुपयाचा एक शेअरची किंमत झाली 2.36 लाख रुपये, कुठली कंपनी?

| Updated on: Oct 30, 2024 | 1:21 PM

Share Market : शेअर बाजाराच्या इतिहासात कदाचितच कुठल्या शेअरमध्ये इतकी वृद्धी दिसून आली असेल. शेअर बाजारातले जाणकार ही ऐतिहासिक तेजी असल्याचे म्हणत आहेत. अनेक रेकॉर्ड यामध्ये मोडले गेले. त्यामुळे संपूर्ण देशात या शेअरची चर्चा आहे.

Share Market : खरच असं घडलं, एकादिवसात 3.50 रुपयाचा एक शेअरची किंमत झाली  2.36 लाख रुपये, कुठली कंपनी?
Share Market
Follow us on

दिवाळी सणाचं निमित्त साधून काही जण वेगवगेळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. काहीजण प्रॉपर्टीमध्ये तर काही जण सोन्यात गुंतवणूक करतात. शेअर बाजारही अपवाद नाहीय. अनेक जण दिवाळीच्या सणाला शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. यंदा एक शेअर सगळ्यांचाच बाप निघाला. त्यामुळे एका झटक्यात गुंतवणूकदार मालामाल झाले. ही मस्करी नाहीय. एल्सिड इंवेस्टमेंट नावाच्या शेअरने एवढी मोठी झेप घेतलीय की, सध्या देशातील तो महागडा शेअर बनलाय. एल्सिड इंवेस्टमेंट या स्मॉलकॅप शेअरने MRF च्या शेअरला फक्त मागेच टाकलं नाही, तर सध्या त्यापेक्षा दुप्पट भाव मिळवला आहे.

BSE चा आकड्याने कॅलक्युलेट केलं, तर कोणी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर सध्या तो माणसू अब्जाधीश झाला असता. एक लाख रुपयाच्या एल्सिड सॉल्यूशनने 670 कोटी रुपये बनवले आहेत. आधी या शेअरचा भाव किती होता? आणि आता किती रुपये आहे? ते जाणून घ्या. एकदिवसात या शेअरमध्ये खूप मोठी ग्रोथ दिसून आलीय. जर या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूकीची वॅल्यू 670 कोटी रुपये झाली आहे.

संपूर्ण देशात या शेअरची चर्चा

मंगळवारी एल्सिड सॉल्यूशनच्या शेअरने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. कंपनीच्या शेअरमध्ये एकाच दिवसात 67 लाख टक्के वाढ दिसून आली. 3.53 रुपये प्रति शेअरचा भाव 2.36 लाख रुपयाच्या पुढे गेला. शेअर बाजाराच्या इतिहासात कदाचितच कुठल्या शेअरमध्ये इतकी वृद्धी दिसून आली असेल. शेअर बाजारातले जाणकार ही ऐतिहासिक तेजी असल्याचे म्हणत आहेत. अनेक रेकॉर्ड यामध्ये मोडले गेले. त्यामुळे संपूर्ण देशात या शेअरची चर्चा आहे.

एकादिवसात एक लाख गुंतवणारा अब्जाधीश

जर, एखाद्या गुंतवणूकदाराने 3.53 रुपये प्रति शेयरच्या हिशोबाने 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली असती, तर त्याच्याकडे 28,329 शेअर असते. आज एका शेअरची किंमत 2.36 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. म्हणजे एकूण शेअर्सच मुल्य 670 कोटी रुपये झालं असतं. म्हणजे एकादिवसात एक लाख गुंतवणारा अब्जाधीश बनला असता.