देशातील सर्वात महाग शेअर MRF नाही, 3 रुपयांचा हा शेअर एका दिवसांत 2,36,000 रुपायांवर पोहचला, 66,92,535 टक्के रिटर्न

| Updated on: Nov 03, 2024 | 6:47 AM

penny stock to multibagger: एशियन पेंट्समधील हिस्सेदारीमुळे एल्सिड इन्‍वेस्‍टमेंटचा शेअर दलाल स्ट्रीटवर चर्चेत आहे. शेअरची किंमत एका दिवसापूर्वी 3-4 रुपयांवरून थेट 2.35 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. तथापि, बुक व्हॅल्यू अजूनही सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा जास्त आहे.

देशातील सर्वात महाग शेअर MRF नाही, 3 रुपयांचा हा शेअर एका दिवसांत 2,36,000 रुपायांवर पोहचला,  66,92,535 टक्के रिटर्न
bse
Follow us on

Elcid Investment Share Price: देशातील सर्वात महाग शेअर कोणता तर आतापर्यंत मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड म्हणजेच MRF कंपनीचे नाव घेतले जात होते. या कंपनीचा शेअर 1 लाख 23 हजार 19 रुपयांवर 30 ऑक्टोबर रोजी आहे. परंतु त्या शेअरला 29 ऑक्टोबर रोजी एका स्मॉल कॅप कंपनीने मागे टाकले आहे. एमआरएफला मागे टाकून एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड शेअर या कंपनीचा शेअर भारतीय शेअर बाजारात सर्वात महागडा शेअर बनला आहे. हा शेअर 2,36,000 वर पोहचला आहे. एक दिवसापूर्वी त्याची किंमत 3.37 पैसे होती. म्हणजेच या कंपनीने एक दिवसांत 66,92,535 टक्के रिटर्न दिले आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड शेअर कंपनीचा शेअर 29 ऑक्टोबर रोजी बीएसईवर पुन्हा लिस्ट झाला. या कंपनीचे मार्केट कॅप 4800 कोटी रुपयांवर आले आहे.

21 ऑक्टोबर रोजी सेबीकडून एक परिपत्रक काढण्यात आले. त्यात काही होल्डिंग कंपन्या पुन्हा लिस्ट करण्यात येणार असल्याचे म्हटले. त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही कंपनी पुन्हा लिस्ट करण्यात आली. तसेच अन्य कंपन्यांमध्ये नलवा सन्स इंव्हेस्‍टमेंट, टीव्हिएस होल्डिंग्‍स, कल्‍याणी इन्‍वेस्‍टमेंट कंपनी, LIC इन्‍वेस्‍टमेंट, महाराष्‍ट्र स्‍कूटर्स, GFL, हरियाण कॅपफिन आणि पिलानी इन्‍वेस्‍टमेंट एंड इंडस्‍ट्रीज कॉरपोरेशन या कंपन्यांच्या समावेश आहे.

असा होता प्रस्ताव

2011 पासून या शेअरची किंमत केवळ तीन रुपये प्रति शेअर होती. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची बुक व्हॅल्यू 5,85,225 रुपये होती. यामुळे या शेअरचे भागधारक विक्री करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कारण त्यात 2011 पासून व्यवहार झालेले नाहीत. परंतु सेबीने पुन्हा लिस्ट केल्यामुळे या स्टॉकच्या किंमतीत बदल झाला आहे. एल्सिड इन्‍वेस्‍टमेंट कंपनीच्या प्रमोटर्सकडून 1,61,023 रुपये प्रती शेयर बेस प्राइस डीलिस्टिंग करण्याचा प्रस्‍ताव ठेवला होता. परंतु त्याला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव फेल झाला.

हे सुद्धा वाचा

का आहे हा शेअर महाग

2,00,000 च्या भागभांडवलासह एल्सिड इन्‍वेस्‍टमेंट कंपनीकडे एशियन पेंट्स लिमिटेडमधील 2,83,13,860 इक्विटी शेअर्स आहेत. हा वाटा 2.95 टक्के आहे. त्याची किंमत 8,500 कोटी रुपये आहे. या एकमेव कारणामुळे हा शेअर बाजारांमध्ये इतक्या उच्च किंमतीला पोहचला आहे.

मुंबई येथील धारावत सिक्युरिटीजचे हितेश धारवत या शेअर बाबत म्हणाले की, एशियन पेंट्समधील हिस्सेदारीमुळे एल्सिड इन्‍वेस्‍टमेंटचा शेअर दलाल स्ट्रीटवर चर्चेत आहे. शेअरची किंमत एका दिवसापूर्वी 3-4 रुपयांवरून थेट 2.35 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. तथापि, बुक व्हॅल्यू अजूनही सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा जास्त आहे.