नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्टारलिंक ही उपग्रह कंपनी पुढील वर्षी डिसेंबरपासून भारतात ब्रॉडबँड सेवा सुरू करू शकते. इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी कंपनी देशातील दहा ग्रामीण लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करेल. ग्रामीण भागातील बदलत्या जीवनात ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे महत्त्व यासंदर्भात कंपनी संसद सदस्य, मंत्री आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करेल.
स्पेसएक्सच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड युनिटने डिसेंबर 2022 पासून सरकारी मंजुरीसह दोन लाख सक्रिय टर्मिनलसह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले. भारतातील स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर संजय भार्गव रविवारी म्हणाले, “मी ऑक्टोबरमध्ये खासदार, मंत्री, सचिवांशी 30 मिनिटांचे आभासी संभाषण करण्यास उत्सुक आहे. भारतात पाठवल्या जाणाऱ्या 80 टक्के स्टारलिंक टर्मिनल्ससाठी आम्ही कदाचित दहा ग्रामीण लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करू. ”
याआधी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतातील ऑर्डरची संख्या 500 च्या पुढे गेलीय आणि कंपनी ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक आहे. कंपनी ग्राहकांना $ 99 किंवा 7,350 रुपये प्रति ग्राहक आकारत आहे. कंपनीने ग्राहकांना 50 मेगाबिट ते 150 मेगाबिट प्रति सेकंद इंटरनेट स्पीड देण्याचे आश्वासन दिलेय.
गोव्यातील एका दुर्गम भागाने स्टारलिंक कंपनीने नेटवर्क उभारण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. अन्य भागांमध्ये 100 टक्के मागणी असल्यास स्टारलिंककडून त्याठिकाणी सेवा पुरवली जाईल. यापैकी बहुतांश इंटरनेट नेटवर्क स्थानिक प्रदात्यांच्या माध्यमातून पुरवले जाईल. परंतु ज्या भागात सेवा पुरवणे कठीण आहे तेथे स्टारलिंक सारखे सेटकॉम प्रदाते पुढाकार घेतील. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा भारतातील ग्रामीण भाग स्वतःला 100 % ब्रॉडबँड असल्याचे जाहीर करेल. स्टारलिंक आणि इतर ब्रॉडबँड प्रदात्यांसह काम करू इच्छिणारे राजकारणी आणि नोकरशहा माझ्याशी संपर्क साधू शकतात, असे संजय भार्गव यांनी सांगितले. प्री-ऑर्डर नोटमध्ये स्टारलिंकने म्हटले आहे की त्याची सेवा अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. भारताकडून मोठ्या प्रमाणात प्री-ऑर्डर मिळाल्यास त्याला सरकारी मान्यता मिळवणे सोपे होईल.
संबंधित बातम्या
अंबानी, अदानी आणि टाटा यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी NTPC चा मेगा प्लॅन
Elon Musk’s Starlink service launched in India from December 2022, will get high speed internet