कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित सदस्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. ईपीएफओद्वारे चालविल्या जाणाऱ्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव (ELI) योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ॲक्टिव्हेट करावा लागेल आणि बँक खात्याशी आधार लिंक करावा लागेल. सरकारनं ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांनी तसे न केल्यास त्यांना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्हचा लाभ मिळणार नाही. ईपीएफओ कर्मचाऱ्यांकडे या प्रक्रियेसाठी केवळ आजचा दिवस शिल्लक आहे.
आजची ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख
एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI ) योजनेचे तीन कॅटेगरी A.B.C असे आहेत आणि जुलै 2024 मध्ये सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली होती. ELI योजनेत प्रथमच सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) द्वारे लाभ मिळतो. अशा तऱ्हेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी आपले UAN ॲक्टिव्हेट करावे लागेल, तर आधार कार्ड बँकेशी लिंक करावे लागणार आहे.
UAN कोण सक्रिय करू शकेल?
स्टेप 1 : यूएएन ॲक्टिव्हेट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओ मेंबरला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या पोर्टलवर जावं लागेल.
स्टेप 2 : त्यानंतर महत्वाच्या लिंक सेक्शनमध्ये जा आणि ॲक्टिव्ह यूएएनवर क्लिक करा.
स्टेप 3 : या ठिकाणी आपला यूएएन नंबर, आधार नंबर, जन्मतारीख आणि आधार लिंक्ड मोबाइल नंबर टाका. यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल.
स्टेप 4 : ओटीपी टाकून ॲक्टिव्हेशन पूर्ण करा, त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल.
यूएएन ॲक्टिव्हेट झाल्यानंतर कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्याचा तपशील, पीएफ पासबुक पाहणं आणि डाउनलोड करणं, पैसे काढणं, आगाऊ किंवा हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाइन क्लॉम सादर करणं, वैयक्तिक तपशील अपडेट करणं यासह ईपीएफओसंबंधित सेवांचा ऑनलाइन लाभ घेऊ शकता.