कंपनी बदलताय?, आता ‘हे’ काम करणं आणखी सोप्पं, जाणून पूर्ण प्रक्रिया

| Updated on: Feb 10, 2021 | 9:43 AM

पीएफओने कर्मचाऱ्यांना घरी बसून तारीख अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. (EPFO updation date of exit)

कंपनी बदलताय?, आता हे काम करणं आणखी सोप्पं, जाणून पूर्ण प्रक्रिया
EPFO updation date of exit
Follow us on

मुंबई : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्य नोकरदारांना अनेकवेळा आपली कंपनी बदलावी लागते. त्यामुळे त्यांना इतर सरकारी योजना आणि कागदपत्रांमध्येही अपडेट करावी लागते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) तसेच जुन्या कंपनीला कंपनी बदलल्याची माहिती द्यावी लागते. कंपनी सोडताना कर्मचाऱ्याला नोकरी सोडतानाची तारीख कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेला सांगणं गरजेचं असतं. पूर्वी हे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या कार्यालयाला अनेक वेळा भेट द्यावी लागायची. तिथे जाऊन कर्मचाऱ्याला नोकरी सोडल्याच्या तारखेची नोंद करून घ्यावी लागायची. मात्र, आता ईपीएफओने कर्मचाऱ्यांना घरी बसून तारीख अपडेट करण्यची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यापुढे कर्मचारी स्वत: नोकरी सोडल्याची तरीख अपडेट करु शकतील. (EPFO given the option of updation of date of exit)

या संदर्भात ईपीएफओ कार्यालयाने ट्विट करुन सविस्तर माहिती दिली आहे. ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार नोकरी सोडल्याची तारीख कर्मचारी आता स्वत: अपडेट करु शकतात. ईपीएफ खातेधारकांना ही माहिती अपडेट करता येईल.

अशा प्रकारे ऑनलाईन अपडेट करा

कोणत्याही संस्थेला सोडण्याची माहिती अपडेट करण्यासाठी एकूण चार स्टेपमध्ये काम करावे लागेल.

>>> कर्मचाऱ्यांनी सर्वात आधी युनिफाईड सदस्य पोर्टलवर जाऊन UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर ही सेवा अपलब्ध असेल.

>>> त्यानंतर Manage या ऑप्शनवर जाऊन Mark Exit वर क्लिक करावे. त्यानंतर Select Employment करुन PF Account Number टाकावा.

>>> त्यानंतर Date of Exit आणि Reason of Exit लिहून Request OTP वर क्लिक करावे. त्यांनतर ईपीएफ अकाऊंटला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करावी.

>> शेवटी Update वर क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यात Date of Exit हे अपलोड झालेले असेल.

ईपीएफ कसा जमा होतो?

जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता, त्यावेळी बेसिक पगाराच्या 12 टक्के रक्कम तुमच्या पगारातून कापला जातो. तेवढीच रक्कम कपंनीकडून दिली जाते. कापलेला 12 टक्के पगार हा व्यक्तीच्या ईपीएफमध्ये जमा होतो. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या रकमेपैकी 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा होतो. तर 8.33 टक्के रक्कम ही पेन्शन योजनेमध्ये (EPF) जमा होते.

संबंधित बातम्या :

EPFO ने तुमचं 8.50% व्याज केलं जमा केलंय; बॅलेन्स चेक केलात का? जाणून घ्या सोपी प्रोसेस

PF वर व्याज लागणार? पण नेमकं किती? समजून घ्या तुमच्या पीएफचा स्लॅब

नोकरीवर असताना EPF मधून पैसे काढायचे आहेत? मग जाणून घ्या इत्यंभूत माहिती

(EPFO given the option of updation of date of exit)